DSK Scam लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
DSK Scam लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

बँक ऑफ महाराष्ट्र विनातपास , विनाचौकशी निर्दोष …….


बँकिंग उद्योग हा एक गुन्हेगारी स्वरूपाचा व्यवसाय आहे असे म्हटले जाते आणि ते सिद्ध करणा-या घटना पुण्यात घडताहेत .डीएसके घोटाळा प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या (बीओएम) अधिका-यांना कोणताही तपास, चौकशी किंवा सुनावणीशिवाय निर्दोष घोषित करण्यासाठी अनेक यंत्रणा आता पुढे सरसावल्याचे समोर येत आहे.


 पुण्यातील इंग्रजी दैनिक पुणे मिररच्या बातमीनुसार डीएसके घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिका-यांना सोडण्यासाठी, पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) च्या कलम १६९  अंतर्गत अर्ज दाखल केला आहे.


 पुणे मिररच्या म्हणण्यानुसार, शीर्ष बँकेच्या तीन अधिका-यांच्या विरोधात पुरावे मिळवण्यात अपयशी ठरल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केला आहे.




विषेश म्हणजे, पुणे कोर्टात दाखल केलेल्या पहिल्याच आरोपपत्रामध्ये मध्ये पोलिसांनी बँकेच्या अधिका-यांविरूद्ध गंभीर आरोप केले आहेत.

त्या आरोपपत्रातील मधील एक परिच्छेद असा आहे

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी ड्रीम सीटी प्रकल्पाला भेट देण्यासंदर्भात दाखवलेले स्वारस्य असामान्य आणि आश्चर्यकारक आहे.त्याचप्रमाणे या भेटीत बँकेने कर्जरुपाने दिलेला संपूर्ण निधी प्रकल्पात वापरला गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतरही कोणतीही कारवाई न करणेही आश्चर्यकारक आहे.

याच आरोपपत्रात पोलिसांनी गंभीर दावा केला आहे की या अधिका-यांनी प्रथम डीएसके ड्रीमसिटीला १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि नंतर एप्रिल २०१७ मध्ये दुसरे १० कोटी रुपये कर्ज मंजूर केले.विशेष म्हणजे आधी दिलेल्या कर्जाचा वापर करण्यात गंभीर चूका आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याऐवजी आणखी कर्ज देण्यात आले.

हे गंभीर नाही का? या बँक अधिका-यांवरही इतर अनेक  गंभीर आरोप आहेत.
मग अचानक अशी गोष्ट कोणती घडली की ज्या आधारे पुणे पोलिस आता सांगत आहेत की बँक अधिका-यांविरोधात काही पुरावे सापडले नाहीत?

प्रत्यक्षात पुणे पोलिसांनी डीएसके घोटाळ्यातील सर्व व्यवहारांचे फोरेंसिक ऑडिट केले आहे. फॉरेंसिक ऑडिटरने दिलेल्या अहवालात फक्त बँक ऑफ महाराष्ट्रच नव्हे तर इतर अनेक बँकांनी केलेल्या गंभीर घोटाळ्यावर प्रकाश टाकला आहे.आणि म्हणूनच बँकाना आणि त्यांच्या राजकीय समर्थकांना या प्रकरणाची कोणतीही तपासणी, ट्रायल किंवा सुनावणी नको आहे.

त्यामूळेच येनकेनप्रकारे या प्रकरणातून अधिका-यांची नांवे वगळण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.

खात्रीलायक सुत्रानुसार अलीकडेच या आरोपींपैकी एकाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती.

डीएसके घोटाळ्यातील बेंक ऑफ महाराष्ट्रच्या अधिका-यांना अटक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमधील भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता जाहीर केली होती. मात्र त्याच्या घोषणेनंतर लगेचच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नोकरशहांना अटकेपासून पूर्णपणे संरक्षण देण्यात आले.त्याचप्रमाणे अटके झालेल्या बँक ऑफ महरष्ट्रच्या अधिका-यांना पोलिस व न्यायलयीन कोठडीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले .

प्रथम पोलिसांनी बँक़ेच्या अधिका-यांना तडफदारपणे पकडले परंतु त्यानंतर त्याच अधिकाऱ्यांनी त्यांना सोडवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड सर्वांनी पाहिली.

हे सर्व राजकिय  दबाव किंवा हस्तक्षेपाशिवाय होते शक्य होते का?

ज्या त्वरेने आणि प्रकारे बँकेच्या अधिका-यांना जामीन मिळाला आहे त्याला डीएसकेच्या फिक्स डिपॉझिट (एफडी) धारकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सदर प्रकरण पुढे कसे वळण घेते हे पहाणे मनोरंजक ठरेल.मात्र हे खरे आहे की गुंतवणूक घोटाळ्यातील किंवा बँक फसवणुकीतील पीडितांचे रक्षण करण्यासाठी भारतातील कोणताही राजकीय पक्ष आतापर्यंत पुढे आलेला नाही. परंतू हेच राजकीय पक्ष अशा घोटाळेबाजांना केवळ संरक्षणच देण्यासाठीच नव्हे तर त्यांना कोणत्याही चौकशीशिवाय निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे मात्र नक्की.

Subscribe for Free


To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                   
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                  https://vijaykumbhar-hindi.blogspot.com/
                  https://vijaykumbhar.blogspot.com/
                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com


शुक्रवार, ६ जुलै, २०१८

बँकिग क्षेत्रातील भ्रष्टाचार: मोदींच्या पवित्र्याने अधिकारी आणि कर्मचा-यांचे धाबे दणाणले !

केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी वरिष्ठ केंद्रीय अधिका-यांना दिलासा देण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक् कायद्यात सुधारणा करण्याचे सुतोवाच केल्यानंतर विशेषता बँकिग क्षेत्रातील अधिकारी कर्मचा-यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या .


 मात्र तो आनंद फार काळ टिकला नाही.


 आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिग क्षेत्रातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही बँकाचे जे अधिकारी भ्रष्टाचार , घोटाळे, गुन्हेगारी संगनमत यात गुंतले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे म्हटल्याची बातमी आली आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले.


 अरूण जेटली काहीही म्हणाले असले तरी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करून वरिष्ठ अधिका-यांना दिलासा देणे सोपे नाही.


 यापूर्वीच्या सरकारने तसा प्रयत्न केला होता,  कायद्यात तशी सुधारणाही केली होती परंतु सर्वोच्च न्यायालयात ती टिकली नाही.


 सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने यापूर्वीच निकाल दिला आहे की केंद्र शासनाच्या सेवेतील सचिव किंवा वरिष्ठ स्तरावरील अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी कुणाचीही पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही. त्यामुळे  बँकेच्या अधिकार्यांना अटक करण्यापूर्वी केंद्र शासनाची किंवा रिझर्व बँक ऑफ इंडिया ची किंवा केंद्र शासनाची परवानगी घेणे गरजेचे होते की नाही या वादावर यथावकाश पडदा पडेलच.


 बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डीएसके घोटाळा प्रकरणी अटक झाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी देशभर काहूर उठवले.


 परंतु या निमित्ताने बँकेचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांचे नेते यांचे संगनमतही उघडकिस आले.




असे संगनमत चांगल्या कारणासाठी झाले असते तर ते समजण्यासारखे होते मात्र एकमेकांच्या गैरव्यवहारांवर पांघरून घालण्यासाठी आणि जनतेची आणि बँक कर्मचा-यांची दिशाभूल करण्यासाठी जेंव्हा असे संगनमत होते तेंव्हा ते घातकच असते.

कर्मचारी संघटनांनी कुठेही आमच्या बँकेत घोटाळा झालाच नाही , आमचे वरिष्ठ अधिकारी निर्दोष आहेत किंवा चौकशी होउन जाउ द्या, आमची बाजू खरी ठरेल अशी भूमिका घेतली नाही.

त्यांचे एवढेच म्हणने आहे की आमच्या वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई करू नका , त्यांच्यावरील कारवाई चूकीची आहे.

अर्थात त्यांनी असे म्हणण्यालाही काही कारणे आहेत .

काही कर्मचारी नेते या निमित्ताने वरिष्ठ अधिका-यांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करू पहात आहेत एवढेच .

बँकेच्या व्यवस्थापनाने काही कर्मचारी नेत्यांबाबतची प्रकरणे त्या कर्मचारी नेंत्यावर दोषारोप ठेवल्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई न करता वर्षानुवर्षे दाबून ठेवल्याचे दिसून येत आहे.

त्याबदल्यात व्यवस्थापनाच्या गैरव्यवहाराना पाठिशी घालण्यासाठी आपल्या संघटनांची ताकत वापरण्यात या नेत्यांनी धन्यता मानली आहे.

कुणीही बँकेतील एखादा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न  केला तर हे नेते त्याच्यावर ‘ बँकेची अप्रतिष्ठा होते‘ या नावाखाली दबाव आणतात.

म्हणजे गैरव्यवहार केल्याने बँकेची अप्रतिष्ठा होत नाही परंतु  तो उघडकिस आणला तर मात्र बँकेची अप्रतिष्ठा होते हे तर्कट अजब आहे.

वर्ष २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात बँक ऑफ़ महाराष्ट ने ८० प्रकरणात सुमारे ४४० कोटी रुपयांची बनवेगिरी ( फ्रॉड )  झाल्याचे रिझर्व बॅकेला कळवले आहे.

पुण्यातील एक नागरिक सुहास वैद्य यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत महाराष्ट्र बँकेने सदर माहिती दिली आहे.

या माहितीत बँकेने फ्रॉड्सची एक यादीही दिली आहे .मोठ्या फ्रॉडच्या रकमा अनेक आहेत परंतु त्यात एका युपीआय फ्रॉडचा उल्लेख आहे.त्यात सुमारे ३० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे बँकेने मान्य केले आहे.

युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बँक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे.

मात्र ही सुविधा न वापरता बँकेने स्वत:चे युपीआय ॲप तयार करून घेतले आणि त्याची सुरक्षीतता न पहाता ते अनेकांना वापरू दिले. त्यातून बँकेला करोडो रुपयांचा गंडा घातला गेला . त्या पैशांची तरतुद म्हणून बँकेने २०१६ – २०१७ या वर्षात २९.५८ कोटी रुपये दिले.

 ते ॲप नंतर दुरुस्त करून घेण्यात आले .परंतु झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ?  ते तयार करण्याचा आणि ते वापरू देण्याचा निर्णय कुणाचा होता ? त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली ?याचे उत्तर मिळत नाही.

२०१७ – २०१८ या वर्षात बँकेने एकूण ९६७ कोटी रुपयांची तरतूद फ्रॉड्समूळे झालेल्या अपहाराच्या भरपाईसाठी केलेली त्यांच्या वार्षिक अहवालातून लक्षात येते.   

४४० आणि ९६७ कोटींचे घोटाळे हे फक्त दोन्आर्थिक वर्षातील घोटाळे आहेत. यावरून एकूण घोटाळ्याची व्याप्ती किती असेल याचा विचार करा!

ही बनवेगिरी बँकेचे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या संगनमताशिवाय झाली असेल असे मानने फारच भाबडेपणाचे ठरेल.

मग बँक अधिकारी व कर्मचा-यांच्या संघटनांनी या विरूद्ध आवाज का उठवला नाही?

खरेतर बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांनी एकमेकांवर अंकूश ठेवण्याचे काम करणे अपेक्षित असते परंतु इथे मात्र एकमेकांशी संगनमत करून एकमेकांच्या चूकांवर पांघरून घालण्याचेच काम दोघांनीही केल्याचे दिसते.

व्यवस्थापनाच्या गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्याची किंमत म्हणून काही कर्मचारी नेत्यांवर दोषारोप ठेवल्यानंतरही व्यवस्थापनाने पुढील कारवाई केली नाही.

एक कर्मचारी नेते ज्यांच्यावर २०१३ साली बँकेने दोषारोपपत्र ठेवले होते त्यात ‘ नैतिक अध:पात‘ आणि कर्मचारी संचालक होण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप होता.

त्या आरोपपत्रातील संबधीत भाग खालील प्रमाणे आहे.

Your act of concealment of the facts of aforesaid cases pending against you in the respective Court of Law and knowingly making a false statement in the said forms submitted by you to the Bank pertaining to or in connection with your employment as Director in the Bank is an act of gross misconduct under clause 5 (m) of Chapter XIX of the Bipartite Settlement dated 19.10.1966 as amended from time to time.
The above-mentioned acts committed by you. are offences involving moral turpitude for which you are liable to conviction and sentence under the various provisions of law which is misconduct under the provisions of Bipartite Settlement dated 19.10.1966 as amended from time to time.
It has been, therefore, decided to conduct the departmental inquiry against you for the above-mentioned acts of gross misconducts alleged to have been committed by you and charges levelled against you

आता एवढे गंभीर आरोप असतानाही व्यवस्थापनाने त्या कर्मचारी नेत्यावर कारवाई का केली नाही ?

आता दुस-या एका नेत्याचे पराक्रम पाहूयात.

या नेत्याने सुरुवातीला आपल्या पत्नीच्या नावावर व्यवसाय सुरू केला. ते स्वत: या बँकेत  कंप्युटर ऑपरेटर होते .

कोणत्याही सरकारी कर्मचा-याला खाजगी व्यवसाय करता येत नाही .

असे असतानाही या महोदयांनी त्या व्यावसायिक खात्यातून स्वत:च्या खात्यावर पैसे वर्ग करून घेतले.

ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांनी तो व्यवसाय दुस-याच्या नांवावर केला.

दरम्यान व्यवस्थापनाने त्यांना  नोटीस काढली मात्र त्याला समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली .

त्या नोटीशीत मुद्दे खालील प्रमाणे.

An explanation was sought to vide letter no, xxx dated 16.4.2-004  in respect of payments made to you on various dates from Current. a/c. no. xxx of Ms .xxx systems with our Deccan Gymkhana branch and also in respect of transactions in your SB  a/c. no. .xxxx , SB a/c. no. xxx and CC account no. xxx with our Bajirao Road branch.  You have submitted your reply dated 23.4.2004. Your explanation is not found  satisfactory   for the following reasons                                                                                                                                                              
The current account no. xx of Ms .xxx  was opened with   Deccan Gymkhana branch on 9/6/1994. At the time of opening of the account, Mrs.xxx  was the proprietor. However,  on  17.4.!997 Mr, xxx took over as new proprietor of Ms. Xxx systems. Your claim that you withdrew payments on behalf of Mrs.xxx  is not tenable because  after  17.4,1997   also   you received Payments  from the said account, details of   which are  informed to you In letter dated I6.4.2004 moreover, if at all Mrs.xxxx had sought your services as a staff member there was no reason for transfer of amount through cheques from the account of Ms. Xxx systems to your own account.
As regards transactions in SB a/c no xxx with Bajirao Road you have simply mentioning that both transactions pertain to the investment made by your father. However, you have not given any specific details particularly regarding credit of Rs. 50,000 /- on 1.6.1996 by way of transfer. Regarding transactions in SB a/c no xxxx you have given the explanation about only two entries dated 9/12/2000 and 1.10.2001. you have not given explanation rest of the entries mentioned in letter Dated 16.4.2004.
You have not given any explanation regarding turnover of Rs.12 lakh in S/B a/c no xxx from 17.7.1995 to 9.1.2004. Regarding turnover of Rs 39 lakhs in your SB a/c no xxx from 5/8/1995 o 10.4.2004 and regarding turnover of Rs.  3,79.0000 in your CC account no xx from 24.2.2003. It was expected of you to have submitted your explanation with exact and complete details in respect of each of the major transactions appearing in these accounts.
In absence of a satisfactory explanation from you,   the details of transactions from. .a./c of XXX  System  and from. ,SB a/c. no.xxx , SB a/c. no. xxxx- and CC a/c no . xx Show that you have income other than salary income from The Bank. As per provisions of B.P.  Settlement, the staff member cannot, engage himself in any trade or business without prior permission and also cannot engage in any speculative activities.P lease, therefore,  show cause as to why  disciplinary' action should not be initiated against you for earring income other than salary income; without the Permission of the Bank as  appearing in above referred accounts and from the account of m/s. xxx  Systems: You have not obtained the permission of the Bank for engaging in any trade/business. Your-. The reply should be submitted within 7 days from the date of receipt of this letter failing which it will be presumed that you have nothing to say in the matter.

या महोदयांनी कोणता व्यवसाय केला कुणाबरोबर केला याची कुणीही वाच्यता केलेला नाही. त्यांना २००४ मध्ये कारणे दाखवा नोटीस देण्यात आली .

मात्र त्यांच्यावर इतके गंभीर आरोप असूनही  पुढे काहीच झाले नाही.

२००४ नंतर अनेक अधिकारी आले आणि गेले परंतु कुणीही आणि काहीही केले नाही
कारण एकच !

तुम्ही आमच्या गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करा आम्ही तुमच्या गैरव्यवहारांना पाठिंबा देतो!

बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मराठे आणि इतर दोन अधिकारी गुप्ता आणि देशपांडे हे दोषी आहेत असे इतक्यातच म्हणने जसे बरोबर नाही तसेच  पुरेशी चौकशीही होउ न देता त्यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे.

इथे प्रश्न कर्जवाटपातील अनियमिततेचा नाही तर डीएसकेच्या बेकायदा धंद्यांना मदत करण्याचा आहे.

मराठे यांनी स्वत: डीसके ड्रीमसिटी भेट दिली. तिथले काम समाधानकारक नसताना पुढील कर्ज दिले . त्यावेळी ते स्वत: कर्ज मंजूरी समितीचे अध्यक्ष होते. इतकेच नव्हे तर बँक ऑफ़ महाराष्ट्रच्या मोठ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणा-या समितीतही रविंद्र मराठे सलग दोन वर्षे आहेत.सुरुवातीला सदस्य आणि नंतर त्या समितीचे प्रमुख म्हणून ते काम पहात होते. त्यामूळे त्यांना जबाबदारी कशी झटकता येईल?

अगदी गुप्ता आणि इतर अधिका-यांचा जामीन अर्ज पाहिला तरी त्यांनी बँकेने फार पूर्वी म्हणजे २०११ साली डीएस कुलकर्णी आणि इतर चार संचालकांना विलफुल डिफॉल्टर घोषित केल्याचे म्हटले आहे .

त्या जामीन अर्जातील इंग्रजी वाक्य असे आहे

It is most respectfully submitted by the applicants the bank has already been declared D.S. Kulkarni i.e. Principle borrower and other 4 directors as a willful defaulters i.e. way back in 2011.Moreover Bank has also initiated E-Auction with respect properties Mortgaged.

आताहे जर खरे मानले तर मग २०१४ साली ६०० कोटी रुपयांचे कन्सर्टोयिम कर्ज आणि नंतर कन्सर्टोयिम बाहेराची कर्जे बँक ऑफ महाराष्ट्रने कशी मंजूर केली ?


याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतेय !

Related Stories



Subscribe for Free


To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com

शनिवार, १२ मे, २०१८

डीएसके घोटाळा :डीएसकेच्या ४५९ मालमत्ता , २७६ बॅंक खाती आणि ४६ गाड्या जप्तीच्या राज्य शासनाकडून अधिसूचना ..

अखेर राज्यशासनाने डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स आणि त्यांच्या संचालकांच्या मालमत्तांचा जप्तीच्या दोन अधिसूचना काढल्या आहेत .या दोन अधिसुचनांद्वारे राज्य शासनाने डी एस कुलकर्णीच्य रहात्या बंगल्यासह सुमारे ४५९ मालमत्ता , २७६ बॅंक खाती  आणि ४६ गाड्यांचा समावेश आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मावळ प्रांताचे उपविभागीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी डी एस कुलकर्णी ,पत्नी हेमंती आणि इतर संचालकांवर पुणे , मुंबई आणि कोल्हापूर येथे हुंहे दाखल आहेत. शासनाने या अधिसूचनांमध्ये पुण्या बरोबरच मुंबई आणि कोल्हापूर येथील गुन्ह्यांचाही समावेश केल्याने मुंबई आणि कोल्हापूर येथील गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी दीपक कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत 





Related Stories 


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com

बुधवार, २ मे, २०१८

डीएसके घोटाळा : शिरिष कुलकर्णी जामीन अर्जावर उद्या कोल्हापुरात तर परवा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी …

डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्सचे ( डीएसकेडीएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी शिरिष कुलकर्णी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाने ४ मे पर्यंत पुढे ढकलली.


दरम्यान कोल्हापूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी शिरिष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या म्हणजे ३ मे रोजी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ठेविदार आणि सदनिका धारकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी डीएसकेडीएल आणि त्यांच्या संचालकांच्या इतर कंपन्यांवर पुणे मुंबई आणि कोल्हापुर येथे गुन्हे दाखल आहेत .



पुण्यातील गुन्हाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आपली फसवणूक केल्याबद्दल ताशेरे ओढल्यानंतर आणि त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी दीपक आणि हेमंती यांना दिल्ली येथून अटक केली होती . आता दोघेही मागील २.५ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

याच प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयाने प्रकरणाचे गांभिर्य आणि ठेवीदारांचे हित लक्षात घेउन शिरिष कुलकर्णी याचा जामीन अर्ज फेटाळला होता.



त्यापूर्वी शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला होता. शिरीष कुलकर्णी यांनी पुण्याच्या सेशन्स कोर्टात न जाता थेट हायकोर्टात धाव घेतल्याने प्रथम सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले होते.
त्यानंतर शिरीष कुलकर्णी याने केलेला  अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने  फेटाळला होता.
हा अर्ज फेटाळताना  विशेष न्याया लयाने ‘या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी हे आरोपी आहेत, की नाही हे ठरविणे तपास अधिकाऱ्यांचे काम असून यामध्ये वृद्ध, निवृत्त अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी लेखी म्हणणेदेखील सादर केले आहे. या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. प्राथमिक तपासात फसवणुकीची रक्कमही मोठी असल्याचे दिसत असल्याचे  निरिक्षण नोंदवले होते‘


त्यानंतर शिरिषने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

Related Stories



Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

डीएसके घोटाळा – लवादाच्या आदेशाला अपील प्राधिकरणाची स्थगिती , गुंतवणूकदार संभ्रमात !

नॅशनल कंपनी कायदा अपील प्राधिकरणाने (एनसीएलएटी)  १३ मार्च २०१८ रोजी नॅशनल कंपनी कायदा  प्राधिकरणाने (एनसीएलटी) डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या संदर्भात दिलेल्या आदेशाला काल स्थगिती दिली आणि पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. 


काल झालेल्या आदेशाचा अर्थ लावण्यापूर्वी एनसीएलटी, एनसीएलएटी  आणि एसएफआयओ म्हणजे काय ते पाहू.
            























एनसीएलटी ही कंपनी कायद्याखाली निर्माण करण्यात आलेली यंत्रणा असून कंपन्यांची  दडपशाही, गैरव्यवस्थापन , आजारी कंपन्यांबाबतचे दावे ठराविक कालावधीत निकाली काढण्याचे अधिकार त्यांना आहेत.

तर एनसीएलटीच्या निर्णयाविरूद्द एनसीएलएटीकडे दाद मागता येते .
सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑर्गनायझेशन ( एसएफआयओ) ही भारत सरकारची यंत्रणा असून फसवणूकीच्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करीत असते.

डी. एस कुलकर्णी डेव्हलपर्सचे संचालक आणि त्यांच्या इतर कंपन्यांनी केलेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणूकि संदर्भात एसएफआयओने एनसीएलएटीकडे एक याचिका दाखल केली होती. 

याचिकेवर सुनावणी करताना १३ मार्च २०१८ रोजी एनसीएलएटीने डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडचे आजी माजी संचालक, अधिकारी  आणि संबधित कंपन्या यांची बँक खाती गोठवण्याचे , लॉकर सील करण्याचे आणि मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्र ,  राज्य सरकार आणि इंडियन बँक असोसिएशनला दिले होते  .

त्याचप्रमाणे  याचिकेची असामान्य परिस्थिती विचारात घेउन  आवश्यकता भासेल तेंव्हा याचिकाकर्त्यांना म्हणजे एसएफआयओला त्यांनी केलेली विनंती आणि मागणी यांची व्याप्ती वाढवण्यासाठी  प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सवलत एनसीएलटीने दिली होती .

या संपूर्ण आदेशाविरूद्ध  डी. एस कुलकर्णी किंवा कुणीही वरीष्ठ न्यायाधिकरणाकडे दाद मागीतलेली नव्हती . 



पुढे जाण्यापूर्वी आता आधी एनसीएलएटीने काल दिलेले काय आदेश आहेत ते पाहूया .

अपीलकर्त्यांच्या ( शिरिष कुलकर्णी )  वकिलांच्या म्हणण्यानुसार एनसीएलटीने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४१,  २४२ नुसार दिलेले अंतरीम आदेश हे कलम  २४२ (४)  मधील तरतुदीच्या विरोधात आहेत. कलम २४२ (४)  नुसार अर्जदाराने ( म्हणजे एसएफआयओने)  आपल्या अर्जात दुरुस्तीची मागणी केलेली नसताना त्यांच्या याचिकेची व्याप्ती वाढवण्याची सवलत स्वत:होउन देण्याचा अधिकार एनसीएलटी लवादाला नाही .

प्रतिवादींना ( एसएफआयओला)  नोटीशीच्या प्रती स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात याव्यात. प्रक्रिया शुल्क भरले नसल्यास उद्यापर्यंत भरावे व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात .अपीलार्थीने ( शिरिष कुलकर्णीने ) इमेल दिल्यास प्रतिवादींना इमेलने नोटीशी पाठवाव्यात.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल, मुंबई यांनी १३/०३/२०१८ रोजी  सी पी ३७८ / २४१-२४२ / एनसीएलटी / एमएन / एमएएच / २०१८ नुसार   पारीत केलेल्या केलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत देण्यासाठी अपीलकर्त्याला ( शिरिष कुलकर्णीला)  दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात येत आहे  .

११ मे २०१८  रोजी मोठ्या खंडपीठापुढे अपिल क्र १०१  (एटी) २०१८   मध्ये अशाच समस्येवर  सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यावेळी हे अपीलसुद्धा सुनावणीस ठेवण्यात यावे 

पुढील आदेशापर्यंत एनसीएलटी लवादाच्या १३ मार्च रोजीच्या आदेशास स्थगीती देण्यात येत आहे . लवादाने आपल्या आदेशात प्रतीवादींना ( एसएफआयओला )  दिलेल्या सवलतींच्या आधारावर पुढील कार्यवाही करू नये.

वरील आदेशाचे वाचन केल्यानंतर अपीलार्थीने  म्हणजे शिरिष कुलकर्णीने एनसीएलटीच्या संपूर्ण आदेशावर नव्हे तर एसएफआयओच्या मागणी शिवाय याचिकेची व्याप्ती वाढवण्याची जी सवलत स्वत्:होउन दिली आहे त्यावर आक्षेप घेतल्याचे दिसून येते .

एनसीएलटी लवादाच्या १३ मार्च रोजीच्या आदेशास स्थगीती देण्यात आली असली तरी लवादाने आपल्या आदेशात प्रतीवादींना ( एसएफआयओला )  दिलेल्या सवलतींच्या आधारावर पुढील कार्यवाही करू नये एवढेच म्हटले आहे. 

याचा अर्थ एनसीएलएटीने एनसीएलटीचे आदेश रद्द केलेत असा होत नाही.

त्यामूळे आता लगेचच दीपक कुलकर्णी आणि त्याच्या साथीदारांची गोठवलेली बँक खाती मोकळी होतील किंवा त्यांना मिळकती विकायची परवानगी मिळेल  असे नाही.

दरम्यान एनसीलएलटीने डीएसकेडीएल च्या विरोधात मोठ्या प्रमाणात दाखल होत असलेल्या खटल्यांची संख्या लक्षात घेउन या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे .

नॉन कन्वर्टीबल डिबेंचर्स ( एनसीडी ) धारकांचे पैसे मुदतीत परत न दिल्याने डिबेंचर ट्रस्टी कॅटॅलिस्ट ट्रस्टशीप यांनी डीएसकेडीएलच्या गहाण जमिनी विकून एनसीडी धारकांचे पैसे परत करण्यासाठी एनसीएलटीमध्ये याचिका दाखल केली होती.

सदर  याचिकेची सुनावणी ६ एप्रिल रोजी होणार होती , मात्र त्या दिवशी सुनावणी न झाल्याची बाब काल वकिलांनी लक्षात आणून दिल्यानंतर वरील बाब समोर आली.

एनसीएलटीने सर्व याचिकांची  सुनावणी एकत्रित करण्याचे ठरवए असले तरी अद्याप पुढील तारीख ठरलेली नाही.

लवकर तारीख न ठरल्यास लवकर सुनावणीसाठी अर्ज करण्याचा निर्णय डीबेंचर ट्रस्टींनी घेतला आहे.

Related Stories


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                     
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com