विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: माहिती अधिकार कट्टा

माहिती अधिकार कट्टा


मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत सुरू झालेल्या माहिती अधिकार कट्टय़ाला उत्तम प्रतिसाद मिळत असून,आता आजी माजी शासकीय कर्मचारी अधिकारीही या उपक्रमात सहभागी होउ लागले आले आहेत. येथे आपसातील चर्चेतून गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते.

कट्टय़ावर माहिती अधिकाराबाबत प्रश्न विचारता येतात, मते मांडता येतात, चर्चा करता येते , अडचणी मांडता येतात,परंतु कोणीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत नसते.आपसातील चर्चेतूनच गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमामागील हेतू आहे. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमामागील हेतू आहे.

चित्तरंजन वाटिका येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत माहिती अधिकार कट्टा भरत असतो

(संपर्क: विजय कुंभार - ९९२३२९९१९९) 

No comments:

Post a Comment