गुरुवार, १ मार्च, २०१८

डीएसके घोटाळा :आज पुणे पोलिसांची डीएसकेंपासून सुटका !

आज पुणे पोलिसांची डीएसकेंपासून सुटका !


शीर्षक विचित्र वाटते ना ? 


परंतु ते खरे आहे.


प्रत्येक पोलिस अधिका-याच्या किंवा तपास अधिका-याच्या जीवनात एक तरी तपास असा असतो कि तो आयुष्यभर लक्षात रहातो.


डीएसके प्रकरणही असेच प्रदीर्घ काळ पोलिसांच्या आणि पुणेकरांच्याही लक्षात राहील. 


आज न्यायालयाने डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिलेली पोलिस कोठडीची मुदत संपूष्टात येईल आणि त्यांची रवानगी एकतर न्यायालयीन कोठडीत होईल किंवा त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.



ग्लॅमरचा सोस कुणाच्या जिवावर ?












शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळयाप्रकरणीपुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर डी एस कुलकर्णींनी जे काही नाटक केले होते त्याला तोड नव्हती. 

बरेच गुन्हेगार अटक झाली की आजारी पडतात, मग कुणाच्या छातीत कळ येते तर कुणाचा रक्तदाब अचानक वाढतो. आणि मग त्याला पंचतारांकित रुग्णालयात दाखल करण्यात येते .

डीएसकेही त्याला अपवाद नव्हते . पोलिस कोठडी मिळाल्याच्या पहिल्याच रात्री डीएसके म्हणे कोठडीत तोल जाउन पडले आणि त्यांची रवानगी ससून रुग्णालयात करण्यात आली .

कोठडीत पडल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे मागितली. ही मागणी न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. 


मुलाच्या वेगाला वडील आवरू शकले नाहीत



ससून रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याने त्या सुविधांसाठी डीएसके १०० कोटीं रुपयांचा निधी उभारण्याचे घोषित करतील असे वाटले होते परंतु तसे घडले नाही.

१०० कोटी रुपयांचा निधी उभारण्या ऐवजी त्यांनी सर्व सुविधांनी युक्त अशा दीनानाथ रुग्णालयात जाणे पसंत केले.

दीनानाथ रुग्णालयात पुरेसा आराम केल्यानंतर डी एस कुलकर्णींना पुन्हा पोलिस कोठडी देण्यात आली.

दरम्यान डीएसकेंच्या आजारपणाच्या नाटकामूळे पुणे पोलिस इतके हैराण झाले होते की ’ तपास नको पण नाटक आवरा’ असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली होती. 


स्टँडवरील गाडी प्रत्यक्षातील वेग कसा पकडेल ?

अर्थात अशी वेळ आली असली तरी पुणे पोलिसांनी डीएसके प्रकरण तितक्याच नाट्यमय रितीने हाताळून तपास केला त्यामूळे पुन्हा त्यांना रुग्णालयात नेण्याची वेळ पोलिसांवर आली नाही. 

इतकेच नव्हे तर पुणे पोलिसांनी डीएसकेंकडील महत्वाची कागदपत्रे हस्तगत केली , आलीशान गाड्या जप्त केल्या आणि काही नव्या मालमत्तांचा शोध घेउन त्यांच्या जप्तीचा आणखी एक प्रस्ताव शासनाकडे पाठवला.

हे सगळ सुरू असताना मध्येच डीएसकेंनी पोलिसांनी आपल्याला सुनावण्यात आलेली पोलिस कोठडी चूकीची होती अशा अर्थाचा एक दावा उच्च न्यायालयात दाखल केला. 

त्या दाव्याची सुनावणी यथावकाश होइलच.


 आता विश्रांती पोलिसांच्या मैदानावर !


दरम्यान पोलिसांनी डीएसकेंच्या ज्या आलीशान गाड्या जप्त केल्या त्या सहजासहजी त्यांच्या हाताला लागल्या असे नाही. 

मातोश्री हेमंतीच्या सांगण्यावरून चिरंजीव शिरिषने त्या विक्रीसाठी दलालांकडे दिल्या होत्या तिथून त्या पोलिसांनी हस्तगत केल्या. 

इकडे चिरंजीव शिरिषने वडीलांच्या पावलावर पाउल टाकत आपल्या समर्थकांना भूलथापा देण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे.




वडीलांनी ज्याप्रमाणे ‘ एफडीके पैसे लौटायेंगे मगर तारीख नही बतायेंगे ’ हे ब्रीदवाक्य बनवले होते तीच कॅसेट आता शिरिष वाजवत आहेत.

या संपूर्ण नाट्यप्रवासात आत्ता जरी पुणे पोलिसांची डीएसकेंपासून सुटका झाली असली तरी त्यांनी केलेल्या तपासामूळे डीएसकेंची सुटका या प्रकरणातून होईल असे वाटत नाही.


आता रुबाब सांगायचा कुणाला ?

असो , पुणेकरांना आणि पुणे पोलिसांनाही भविष्यात आणखी काही अजरामर नाटके पहायला मिळणार आहेत एवढे नक्की .

अर्थात ही नाटके पहाण्यासाठी कुठल्याही नाट्यगृहात जायची आवश्यकता नाही . प्रसारमाध्यमे ती घरोघरी पोहोचवतीलच.


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा