पुण्यात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीची मोहिम हातात घेतली असली तरी त्याला कायद्याचा आधार आहे की नाही याबद्दल आता शंका निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार नगरपालिका हदीत दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती नाही.
दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती असावी कि नसावी याबाबतीत अनेक मतमतांतरे आहेत.माझे व्यक्तिगत मतही प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेट वापरले पाहिजे असेच असले तरी त्याच्या सक्तीला विरोध का होतोय याचाही विचार करणे गरजेचे आहे.हेल्मेटचे समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजू आपापल्या सोयीची बाजू मांडत आहेत. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले देत आहेत. त्यामूळे दोन्ही बाजूंचा सारासार बुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णयांमध्ये दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे ठरवले असले तरी शासनाचे नियम डावलून त्याची सक्ती करावी असे म्हटल्याचे आढळून येत नाही.
हेल्मेट सक्तीच्या बाबतीत असुरक्षितता, गैरसोयी, गैरप्रकार हे मुद्दे आहेतच. त्यांचाही विचार करणे आवश्यक आहेच. मुख्यत्वे हेल्मेट जड असल्यामुळे मानेची दुखणी मागे लागतात. बंद हेल्मेटमुळे मागील वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. उन्हाळ्यात हेल्मेटचा वापर करणे बरेच त्रासाचे ठरते अशा तक्रारी आढळतात. त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. परंतु या तक्रारींचे निवारण करण्यासाठी काही मध्यममार्ग काढता येऊ शकतो का हेही पाहिले पाहिजे. वजनाला हलके, मजबूत आणि वापरायला सोयीस्कर असे हेल्मेट बाजारात आले तर कदाचित त्याला होणारा विरोध कमीही होईल्.
त्यातच सध्या वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांच्या विरोधात जोरदार कारवाईला सुरुवात झाली असली तरी या सक्तीला कायद्याचा आधार आहे की नाही याबाबतीत मात्र शंका घ्यायला जागा आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ मध्ये काही सुधारणा करण्यात येणार असल्या तरी त्या सुधारणेला अद्याप मान्यता मिळालेली नाही. सध्या ज्या मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नुसार पोलिसांनी हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणा-या चालकांवर कारवाई सुरू केली आहे त्याला कायद्याचा आधार असल्याचे दिसत नाही.
मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ नुसार दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरी महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम २५० नुसार यातून खालील व्यक्तींना त्यातून वगळण्यात आले आहे.
१. नगरपालिका हद्दीत सर्व प्रकारच्या दुचाकी चालवणा-या सर्व व्यक्ती.
२. राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग वगळता सर्व नगरपालिका क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील रस्त्यावर सर्व प्रकारच्या दुचाकी चालविणा-या सर्व व्यक्ती.
३. नगरपालिका हद्दीशिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५० सीसी क्षमतेपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकी चालवणा-या व्यक्ती.
’नगरपालिका हद्द’ च्या व्याख्येमध्ये महापालिकेचाही समावेश होतो. इंग्रजीमध्ये तो नियम खालील प्रमाणे आहे.
I250. Wearing of protective headgear. — The following persons areexempted from the provisions of section 129 of the Motor Vehicles Act. 1988
(59 of 1988]. namely :—
(i) persons driving or riding all motor cycles in municipal areas;
(ii) persons driving or riding all motor cycles on roads, other than the State Highways and National Highways in areas other than the municipal areas; and
(m) persons driving or riding two-wheeled mopeds fitted with engine capacity of less than 50 cubic centimeters on the State Highways and National Highways in areas other than the municipal areas.]
आता प्रश्न असा आहे की जो नियम अस्तित्वात नाही त्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू आहे मात्र जो नियम अस्तित्वात आहे त्याची सक्ती वाहतूक पोलिस का करत नाहीत ?. याच नियमातील कलम फ्२५० ‘कोणताही चालक वाहन चालवताना ( दुचाकी सह) मोबाईल फोन वापरणार नाही‘ असे आहे. इतकेच नव्हे तर जर चालकाच्या व्यतिरिक्त वाहनामध्ये किंवा वाहनावर कुणी सहप्रवाशी नसेल तर प्रवासादरम्यान मोबाईल फोन बंद ठेवला पाहिजे असाही नियम आहे. या नियमाची कसोशीने पालन केले तर ओला, उबरसारख्या सेवा बंद कराव्या लागतील.
‘f “[250-A. Restriction on use of mobile phone.—
(1) No driver while driving or riding a motor vehicle (including two wheelers) shall use a mobilephone. (2) If no other person, other than the driver. is sitting in or on the motor vehicle, the mobile phone, if any. shall be switched off, during the journey.
पुण्यात हेल्मेट सक्तीचा वाद अधिकच चिघळला आहे.अगदी 'सविनय कायदेभंगा'ची भूमिका घेण्यात आली आहे. मात्र जो कायदाच अस्तित्वात त्याचा भंग कसा काय केला जाउ शकतो ?. मोटार वाहन अधिनियमात नविन ज्या सुधारणा येउ घातल्यात त्यात मात्र दुचाकीवरून प्रवास करणा-या चार वर्षांवरील मुलासह वाहन चालकांना आता हेल्मेट सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. सदर विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून त्यावर अद्याप राज्यसभेत चर्चा झालेली नाही. सदर विधेयक मंजूर होईल तेंव्हा होईल सध्या तरी हेल्मेट न वापरणा-या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याला कोणत्याही कायद्याचा आधार नाही.
हेल्मेटसंदर्भात आपली जी काही भूमीका आहे ती सर्व संबधितांनी कायदे बनवणा-यांच्या कानावर घालून आपणास हवे ते बदल करून घ्यायला हवेत..अगदी केंद्रात कायदा मंजूर झाला तरी राज्य शासन त्याचे आवश्यकतेनुसार नियम करू शकते. वर उल्लेख केलेले नियम त्याच स्वरूपाचे आहेत.
Subscribe for Free
To receive free emails or free RSS
feeds, please, subscribe
to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA is a platform to empower
oneself through discussions amongst each other to solve their problems by using
Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model
Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com _
Email – admin@vijaykumbhar.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter
- https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/vijaykumbhar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा