पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहातील ‘ठोकळ्या’चा अत्यंत गंभीर विषय सर्वसंमतीने आणि हास्यविनोदामध्ये अक्षरश: गुंडाळण्यात आला. खरेतर हा विषय पालिकेतील भ्रष्टाचार , सभागृहाची आणि पर्यायाने त्यातील उपस्थितांची सुरक्षितता, आणि या सुरक्षिततेशी केला जाणारा ‘खेळ ‘ या तीनही दृष्टीनी खूप महत्वाचा होता. परंतु कदाचित पालीकेतील सर्वांना एकमेकांचे सर्व काही माहिती असल्याने हा विषय गुंडाळण्यात आला असावा. एरवी आक्रमक असलेली पालीकेतील शिंदेशाही यावेळी विनोदनिर्मितीच्या प्रांतात घुसलेली दिसली. उधार उसनवारीवर घेतलेल्या लुटुपुटूच्या शिरस्त्राणाच्या आधारे त्यांनी फक्त ‘आपले डोके’ सुरक्षित करण्याचा विनोदी प्रयत्न केला. तर विरोधकांना भीमटोला लागावण्याऐवजी त्यांना गोंजारण्यात सत्ताधा-यांनी धन्यता मानली. कदाचित या सभेचे ‘स्क्रिप्ट’ सर्वसंमतीने इतर कुठेतरी लिहिले गेले असल्याने तसे घडले असावे.
Photo courtesy mpcnews |
महापालिकेच्या विस्तारित इमारतीमधील नवीन सभागृहात पहिल्याच सर्वसाधारण सभेत छतावरून एक लाकडी ठोकळा पडला. गणपतीच्या प्रतिमेचे पूजन तसेच राज्यघटनेच्या अभिवाचनाने सभेच्या कामकाजास सुरुवात झाली.काही भाषणे झाल्यानंतर अचानक छतावरून एक छोटा लाकडी ठोकळा महापौरांसमोरील मोकळ्या जागेत पडला. खरेतर या घटनेनंतर सभागृह सदस्य आणि इतर उपस्थितांमध्ये घबराट पसरणे स्वाभाविक वाटले असते . परंतु तसे घडले नाही.
Photo courtesy Daily lokmat |
सभेची सुरुवात जरी राज्यघटनेच्या वाचनाने झाली असली तरी त्यातील तरतुदींचा मात्र सर्वांना सोयीस्करपणे विसर पडला. भ्रष्टाचार आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भाषण सुरू असताना सभागृहात पाणीगळती सुरू झाली होती. या वेळी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अर्थात पुढे त्याबाद्दल काहीच घडले नाही हा भाग अलाहिदा .
पहिल्या सभेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची उणीव राहु नये यासाठी प्रशासनाप्रमाणेच सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी स्वःत सभागृहात हजर राहुन बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले होते . या इमारतीचा घुमट हा पूर्णत: लोखंडी साहित्यापासून बनविलेला आहे. या ठिकाणी लाकडाचा कुठलाही संबंध नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे . नवीन सभागृहातील ही पहिली सभा असल्यामुळे तिचे पावित्र्य राखण्यासाठी फारशी टीका करायची नाही, कुठले आंदोलन करायचे नाही, किंबहुना श्रद्धांजलीसुद्धा वाहायची नाही, असं नियोजन करण्यात आले होते.
असे असेल तर सभागृहात ठोकळा आला कुठून ? कुणीतरी जाणीवपूर्वक तो ठोकळा सभागृहात आणला असेल तर ती आणखी गंभीर बाब आहे. राज्यघटनेच्या साक्षीने सभागृहात अशांतता जर कुणी केला असेल तर ती बाब अत्यंत आक्षेपार्ह , निंदनीय आणि कारवाईस पात्र आहे.त्यामुळे सभागृहात लाकडी ठोकळा आणणारा तो ‘ठोकळा’ कोण याचाही शोध लागणे गरजेचे आहे.
Subscribe for Free
To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay
Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA is a platform to empower oneself through
discussions amongst each other to solve their problems by using Right to
Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji
nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com _
Email – admin@vijaykumbhar.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter - https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/vijaykumbhar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा