बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

डीएसके घोटाळा : नौटंकीबाज डी एस कुलकर्णीच्या कारवायांचे कर्मचारीही बळी ……

आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर सर्व यंत्रणांच्या डोळ्यात धुळफेक करून डी. एस कुलकर्णी उर्फ डीएसके ज्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आराम फर्मावत आहेत. 

त्याच रुग्णालयात डीएसकेंच्याच एका कंपनीतील कर्मचारी राज शेखर एका दूर्धर आजाराचा सामना करत आहे.


राजशेखरला ब्रेनस्ट्रोक झाला आहे. 


डीएसके टोयोटाचा कर्मचारी असलेल्या राजला एक वर्षभर पगार मिळालेला नसून आज उपचाराच्या खर्चासाठी त्याच्या कुंटुंबियांकडे लोकांसमोर हात पसरायची वेळ आली आहे.


तो त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता घटक आहे.


आज असे शेकडो कर्मचारी आहेत ज्यांना डीएसकेंनी वा-यावर सोडले आणि पुढे काय करावे हे त्यांना समजत नाही.


परिस्थिती इतकी बिक़ट आहे की एकत्रितपणे लढा देण्यासाठी वकिल नेमावा तर त्यासाठी एकतर येण्यासाठीही त्यांना सवड काढता येणे शक्य नाही.


इकडे डीएसके मात्र रोज नव्या क्लृप्त्या लढवून कधी क्राउड फंडींगच्या नावाखाली तर कधी आपल्या मालमत्त्ता विकून करोडो रुपये मिळवण्यात मग्न आहेत.



या विकलेल्या मालमत्तांचा पैसा कुठे गायब होतो ते मात्र कळलेले नाही.


आणि अशा मालमत्ता विकताना न्यायालयाशी किंवा यंत्रंणाशी खोटे बोलताना डीएसके अजिबात लाज बाळगत नाहीत. 

अगदी अलिकडे म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी डीएसकेंनी मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांनी आपल्या मालमत्ता जप्त करून त्यांची नोंदणी न करण्याचे आदेश दिल्याचे अत्यंत साळसूदपणे सांगीतले.

उच्च न्यायालयानेही पोलिसांना मालमत्ता विक्रीत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आदेश पोलिसांना दिले .

मात्र त्या आधीच म्हणजे १२ फेब्रुवारीला डीसकेंनी आपली एक मालमत्ता १४ कोटी रुपयांना विकून टाकली होती आणि त्याची नोंदणी महानिरिक्षक कार्यालयात नोंदही केली होती.

मात्र ही बाब त्यांनी उच्च न्यायालयापासून लपवून ठेवली.


अर्थात कोणत्याही न्यायालयात खोटे बोलणे ही काही डीएसकेंसाठी नवीन किंवा विशेष बाब आहे अशातील भाग नाही.

यापूर्वी अनेकदा त्यांनी तसा प्रयोग यशस्वीरित्या केला आहे.

अगदी १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने उच्चन्यायालयात इंटरव्हेन्शन पिटीशन दाखल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु न्यायालयात उपस्थित असलेल्या गुंतवणूकदारांनी तो हाणून पाडला.

त्यानंतर अवघ्या दोनच डीएसकेंनी आपली फसवणूक केली आहे हे लक्षात येताच मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंवर अत्यंत गंभीर ताशेरे ओढत त्यांना अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले 

संरक्षण काढून घेतल्यानंतर डीएसके आणि त्यांच्या पत्नीने थेट धाव् घेतली ती दिल्लीला.परंतु पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने दिल्लीमध्ये त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना पुण्याला आणले.

पुणे विशेष न्यायालयाने डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

परंतु पोलिसांना सहकार्य करतील तर ते डीएसके कसले?

पोलिस चौकशी सुरू व्हायच्या आधीच आपल्या सहकार्यांकडून मिळालेल्या सल्यानुसार त्यांनी बेशुद्ध पडण्याचे नाटक केले आणि आपली रवानगी ऐशोराम करण्यासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात करून घेतली.

अगदी कालपरवापर्यंत मी तरूण, धडधाकट आहे म्हणणा-या डीएसकेंना अचानक पोलीस कस्टडीत गेल्यावर काय झालं? 

ठेवीदार, पोलीस, न्यायालय, बॅंकांशी खोटं बोलून झाल्यावर आता डॉक्टरांशी पण खोटं! 

सगळे रिपोर्ट नॉर्मल पण माणूस आजारी!

ससून रुग्णालयातील् डॉक्टर आणि कर्मचारी डीएसकेंच्या ‘आजारपणाचे‘ जे किस्से सांगतात ते ऐकले तर कुणीही पोट दुखेपर्यंत हसेल.

असो.

जाहिरातींच्या माध्यमातून जगासमोर उभा केलेला डीएसकेंचा खोट्या चेह-याबरोबरच आता त्यांची प्रचंड गुन्हेगारीवृत्ती सुद्धा जगासमोर आली आहे! 

त्यांनी उच्च न्यायालयाला सुद्धा फसवलं हे आता उच्च न्यायालयाने देखिल मान्य केलं आहे!

त्यांनी तेरा फेब्रूवारीला न्यायालयाला सांगीतले की पोलीसांनी त्यांच्या सर्व मालमत्तांचा ताबा घेतलाय आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या मालमत्ता विकून लोकांना पैसे देता येत नाहीयेत.

असे आरोप करताना आणि हे सगळं न्यायालयासमोर मांडताना आपण खोटं बोलतोय ह्याची त्यांना किचींतही लाज वाटली नाही! 

तेरा फेब्रूवारीला न्यायालयाला हे सांगताना ह्या मंडळींनी आदल्याच दिवशी बारा फेब्रूवारीला पोलीसांच्या नकळत हडपसर इथली त्यांच्या सप्तश्रूंगी ऑइल मिल ह्या 'शेल' कंपनीवरची मालमत्ता गुपचूपपणे तब्बल चौदा कोटी बत्तीस लाख रूपयांना विकली आणि ह्या झालेल्या व्यवहाराबदद्ल कोर्टासमोर किंवा पोलीसांसमोर ब्र शब्द देखिल काढला नाही! 

सप्तश्रृंगी ऑईल मिल हि एक खाजगी कंपनी आहे परंतू डीएसकेंचा ऑईल मिलचा व्यवसाय कुठेही अस्तित्वात नाही तसेच या कंपनीने कोंणताही व्यवसाय केल्याचे ऐकिवात नाही मग त्या कंपनीकडे मालमत्ता विकत घेण्याइतके पैसे कुठून आले?

आणि ही मालमत्ता विकली तर त्याचे पैसे गेले कुठे आणि त्यांनी उच्च न्यायालयापासून हि बाब का लपवली?

गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत या हेतूने मुंबई उच्च न्यायालयाने चाकोरीबाहेर जाउन डीएसकेंना मदतीचा हात देउ केला होता.

परंतु त्याची जाण ठेवण्याऐवजी डीएसकेंनी न्यायालयाला फसवण्यात धन्यता मानली.

जो माणूस उच्च न्यायालयाला फसवायला मागेपुढे पहात नाही त्याच्या दृष्टीने इतर सरकारी यंत्रणा, गुंतवणूकदार किंवा कर्मचारी म्हणजे काहिच नाही.

सप्तश्रुंगी सारख्या एक दोन नाही तब्बल ५० कंपन्या डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्थापन केल्या आहेत. 

या कंपन्या कोणताही व्यवसाय करत नाहीत त्यांच्याकडे एकही कर्मचारी कामाला नाही तरीही त्यांच्या नावावर करोडो रुपयांच्या मालमत्ता दिसून येतात, ते कसे काय ?

एकीकडे कोट्यावधींच्या वेगवेगळ्या कंपन्यांवरच्या मालमत्ता विकून पैसे गायब करत असताना जगासमोर मात्र क्राऊड फंडींगच्या नावाने भिक मागताना, डीसकेंना त्याचे अजिबात वैषम्य वाटत नाही हे विशेष!

Related Stories

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com




1 टिप्पणी:

  1. निदान हा ब्लॉग वाचून तरी मराठी व्यावसायिक, मराठी माणूस अश्या टिमक्या वाजवणारांची तोंडे गप्प होतील अशी अपेक्षा...

    उत्तर द्याहटवा