शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविध विषयांशी संबधित २६४ इतक्या समित्या अवघ्या १ वर्षाच्या काळात स्थापन केल्या आहेत. अर्थात यामध्ये पुनर्गठीत, पुनर्रचित किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्या यांचा समावेश नाही.त्यांचा समावेश केला तर तो आकडा ५२१ इतका होतो. एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल, तो विषय टाळायचा असेल, किंवा इतर काही त्यामागे हेतू असेल तर त्या विषयावर समिती स्थापन करण्याचा हातखंडा शासन प्रशासनामध्ये वापरला जातो.
महाराष्ट्र
राज्याची स्थापना झाल्या नंतर सुरुवातीच्या काळात समित्या स्थापन करण्याचा प्रकार
नगण्य असा होता. महाराष्ट्रातील
पहिली समिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची १९६२
मध्ये स्थापन झाली. त्यानंतर दुसरी
समिती १९६३ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर १९६४ ते १९७० या
काळात अवघ्या 3 समित्या स्थापन करण्यात
आल्या.परंतु नंतर लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढलं आणि
त्याबरोबरच समित्या स्थापनेचे प्रमाणही तेवढेच वाढले.
समित्या
स्थापल्याने त्या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्यांना बरं वाटतं. आपला विषय मार्गी लागला असं वाटतं. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही. नंतर
समित्यांची पुनर्रचना, पुनर्गठण, मुदतवाढ असे प्रकार केले जातात. मुळात शासनात
अपवाद वगळता समित्यांची गरज पडत नाही. प्रत्येक विषयासाठी समिती स्थापन करायची तर
मग अधिकारी,लोकप्रतिनिधींनी
आणि मंत्र्यांनी करायचं काय?.
महाराष्ट्र
राज्याच्या स्थापनेनंतर मंत्रालयात समित्या स्थापन करण्याचे प्रमाण किती आणि कसे
वाढले ते पहा.
१९६४ ते १९७० या
७ वर्षांच्या काळात अवघ्या ३ समित्यांची स्थापना करण्यात आली.त्यानंतर १ जानेवारी १९७१ ते ३१
डिसेंबर १९७५ या ५ वर्षात कालावधीमध्ये
अवघ्या ४ समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा पुनर्गठन
करण्यात आले, १ जानेवारी १९७६ ते ३१
डिसेंबर १९८० या कालावधीमध्ये ८ , १ जानेवारी १९८१ ते ३१
डिसेंबर ८५ या
कालावधीत १८ समित्या, १ जानेवारी १९८६ ते ३१ डिसेंबर १९९० या
कालावधीमध्ये २३ समित्या , १ जानेवारी १९९१ ते ३१ डिसेंबर १९९५ या
कालावधीमध्ये ३९ समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा
पुनर्गठन करण्यात आले
त्यानंतर १ जानेवारी १९९६ ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीमध्ये १२४ समित्या, १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीमध्ये २८० समित्या, १ जानेवारी २००६ ते १ डिसेंबर २०१० या कालावधीमध्ये ८२८ समित्या. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये १२४३, १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेम्बर २०२० या कालावधीत ३०१६ व १ जानेवारी २०२१ ते २९ जून २०२३ पर्यंत राज्य शासनाने १३२५ एवढ्या समित्या स्थापन केल्या किंवा त्यांची पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आले किंवा त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करण्यात आली. यातील जवळपास दोन वर्षांचा कालावधी हा कोविड कालावधी होता. शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात एकूण २६४ समित्या स्थापन केल्या. यामध्ये पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आलेल्या किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्यांचा समावेश नाही.
शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात स्थापन केलेल्या समित्या.
१
भीमा-कृष्णा नदी खोरे करीता महाराष्ट्र
व कर्नाटक राज्याचे मंत्रीस्तरीय आंतरराज्य पूर समन्वय समिती स्थापना करणेबाबत
२
विधानपरिषद आश्वासन समितीपुढे मंत्रालयीन
विभागांकडून पाठविण्यात येणाऱ्या आश्वासन पुर्तीसंबंधीच्या कार्यवाहीबाबत...
३
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना -
पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY
2.0) अंतर्गत पाणलोट समिती (WC) स्थापन करणे बाबत.
४
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन
(सुधारणा) अधिनियम, 2021 अंतर्गत
जिल्हा समिती गठित करण्यासंदर्भात.
५
खोलसापाडा-2, ल.पा.योजना, ता. वसई,जि. पालघर, या
योजनेसाठी आयुक्त वसई- विरार शहर महानगरपालीका , विरार व कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करार(MOU) मधील कलम-24 नुसार मा.मुख्य सचिव, यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
करणेबाबत.
६
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण
कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरावर राज्य सल्लागार समिती तसेच
गव्हर्निंग समिती गठीत करणेबाबत.
७
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या
आस्थापनेवर कार्यरत गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या ५०/५५
व्या वर्षापलिकडे अथवा ज्यांची अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पुर्ण झाली आहेत अशा
अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यासाठी पुनर्विलोन समिती
गठित करणेबाबत
८
कौशल्य, रोजगार, उद्योजकता
व नाविन्यता विभाग आणि त्या अंतर्गतच्या कार्यालयांतील गट अ व गट ब (राजपत्रित)
अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.......
९
महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाच्या
संगणकीकरणासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती स्थापन करण्याबाबत.
१०
जिल्हा परिषद, औरंगाबाद (जि. औरंगाबाद) येथील नवीन
प्रशासकीय बांधकामाची सखोल चौकशी करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबतत...
११
राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा
सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यासाठी राज्य स्तरीय आणि जिल्हा स्तरीय समिती गठीत
करणेबाबत.
१२
GEC-2015
पद्धतीवर आधारित भूजल संसाधनांच्या अंदाजासाठी कायमस्वरूपी
राज्यस्तरीय समितीचे गठन करणेबाबत.
१३
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागसाठी
(खुद्द) लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खरेदी समिती गठीत करण्याबाबत
१४
राज्यातील पाच मोठे जलाशयामधून गाळ व
रेती / वाळू मिश्रीत गाळ निष्कासनाच्या कामाकरिता मानक निविदा कागदपत्रे तयार
करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत.
१५
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ
मर्या (महानंद) मध्ये यंत्रसामुग्री, उपकरणे, साहित्य
इत्यादी खरेदीसाठी राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समिती गठीत करण्याबाबत.
१६
जलसंपदा विभागांतर्गत Master Database Module या
नवीन संगणक प्रणालीमधील बांधकाम व Support
functions करिता समन्वय कार्यालय व अधिकारी यांची समिती स्थापन करणेबाबत.
१७
पर्यावरणपूरक पध्दतीने मूर्तींचे
पाण्यामध्ये विसर्जन करण्याच्या अनुषंगानेबाबत तांत्रिक समितीचे गठण करण्याबाबत
१८
मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत
योजनेअंतर्गत राज्यस्तरीय बालकांची काळजी व सरंक्षण समिती (State Child Welfare and Protection
Committee) गठित करणेबाबत.
१९
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास
संस्थेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या पुलांचे जोडरस्ते अतिवृष्टी काळात पुराच्या
पाण्यामूळे क्षतिग्रस्त होऊन वाहतूक बंद होऊ नये याकरीता उपायोजना/ संकल्पनामध्ये
बदल सुचविण्यासाठी समिती गठीत करणेबाबत
२०
पाणी पुरवठा व स्वच्छता योजनांसाठी
राबविण्यात येणा-या पाणी पुरवठा योजनांच्या निविदेत अप्रत्याशित/ असाधारण
भाववाढीसाठी विशेष मदत देणेबाबत तांत्रिक समितीचे गठन व कार्यपध्दती
२१
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील
कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांची जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती
करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
२२
रासेयो अंतर्गत विविध उपक्रम व
कार्यक्रमाच्या आखणीकरीता रासेयो आर्थिक नियोजन समिती गठीत करणेबाबत
२३
सरकारी वकील कार्यालय, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली या कार्यालयातील गट-ब
(अराजपत्रित) आणि गट-क मधील पदांवर पदोन्नती देण्यासाठी गठित विभागीय पदोन्नती
समिती चे पुनर्गठन करण्याबाबत.
२४
विविध न्यायालये व न्यायाधिकरणांकडे
शासनाकडून तसेच शासनाविरुध्द दाखल केलेल्या व प्रलंबित असलेल्या न्यायालयीन
प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित करावयाच्या Case Management System ची
निवड करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
२५
नवी मुंबई परिसरात अवैध पद्धतीने
मासेविक्री करणाऱ्या परप्रांतीयांना प्रतिबंध घालण्यासंदर्भात उपाययोजना
सुचविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत...
२६
वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई महानगर
प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भूखंडावर अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक
अधिमुल्याचे उचित सुसुत्रीकरण करण्याकरिता अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती
गठीत करण्याबाबत..
२७
केंद्र शासनाला पद्म पुरस्कार 2023 करिता नावे सुचविण्यासाठी शिफारस
समितीची स्थापना.
२८
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ
(प्रतिबंध, मनाई
व निवारण) अधिनियम-2013 मधील
तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना.
२९
राज्यातील अनुसूचित जमातीच्या
उमेदवारांचे केंद्र/राज्य शासनाच्या नागरी सेवा व इतर नोक-यांतील प्रमाण
वाढविण्यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.
३०
जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकरीता
आयपास (iPAS) या
संगणकीय प्रणालीच्या अंमलबजावणीकरीता गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संनियंत्रण
समितीची पुर्नरचना करण्याबाबत
३१
Local
Government Directory (LGD Code) संदर्भात समिती गठित करणेबाबत.
३२
कृषी फिडरचे सौर उर्जीकरण करण्याच्या
दृष्टीने लागणारी जागा महसूल विभागाद्वारे उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने समिती
गठीत करण्याबाबत.....
३३
लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयासाठी संगणकीकरण प्रकल्प
मंजुरीसाठी समिती गठीत करण्याबाबत.
३४
नवी मुंबई परिसरात अवैध पद्धतीने
मासेविक्री करणाऱ्या परप्रांतीयांना प्रतिबंध घालण्यासंदर्भात उपाययोजना
सुचविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत...
३५
पशुसंवर्धन आयुक्त कार्यालया
अंतर्गतच्या स्वीय प्रपंजी खात्यांच्या कामकाज व ताळमेळासंदर्भात समिती गठित
करण्याबाबत.
३६
सर ज.जी. कला महाविद्यालय, सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय आणि
सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालय यांचे मिळून डि- नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत
विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात टास्क फोर्स समिती.
३७
मेट्रो स्टेशन, एस.टी. डेपो व शहर वाहतूक डेपो विकसित
करुन त्यावरील अतिरिक्त जागेचा वापर पोलीस सेवा निवासस्थानासाठी करण्याबाबत अपर
मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणे.
३८
म्हाडाच्या मालकीच्या जमीनीवरील पोलीस
वसाहतीच्या पुनर्विकास करुन पोलीसांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करुन देण्याच्या
अनुषंगाने अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणे.
३९
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत रस्त्यांची निवड करण्यासाठी
जिल्हा स्तरावर समिती नियुक्त करणेबाबत...
४०
अल्पसंख्यांक विकास विभागाच्या
अखत्यारितील कार्यालयांच्या खरेदीसाठी प्रशासकीय विभाग खरेदी समिती गठीत करणेबाबत.
४१
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-अ व
गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील अधिकाऱ्यांकरीता विभागीय पदोन्नती समिती गठीत
करणेबाबत.
४२
राज्यातील बंदरे व मासळी उतरविणारी
केंद्र संदर्भात उद्भवणाऱ्या समस्यांवर कार्यवाही करुन शासनास उपाययोजना
सुचविण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्याबाबत.
४३
धानाकरिता बोनस अदा करण्यासंदर्भात
निर्णय घेण्यासाठी मा. मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यासंदर्भात.
४४
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
चला जाणुया नदीला या अभियानासाठी समिती गठीत करणेबाबत.
४५
संगणकिकृत अधिकार अभिलेख्यांचा वापर
करून शेतकऱ्यांशी संबंधित डिजीटल माहिती तयार करण्यासाठी संनियंत्रण समिती (Steering Committee) व अंमलबजावणी
समिती (Implementation
Committee) गठित करणेबाबत.
४६
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर
संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत
करणेबाबत.
४७
मा.राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे येथील Original Application No. 46/2018 (I.A. No.
121/2019, I.A. No. 124/2019, IA No. 90/2022 and IA No. 91/2022) मा.राष्ट्रीय
हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार समिती स्थापन करणेबाबत.
४८
वांद्रे वरळी सागरी मार्गावरील अपघात
टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने समिती स्थापन करण्याबाबत.
४९
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील गट - अ आणि गट - ब (राजपत्रित) संवर्गातील
वयाच्या 50/55 व्या
वर्षापलिकडील अधिकाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकनासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती
स्थापन करण्याबाबत
५०
सर ज.जी. कला महाविद्यालय, सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय आणि
सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालय यांचे मिळून डि-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत
विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात टास्क फोर्स समिती.
५१
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
चला जाणुया नदीला या अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत.
५२
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील गट-क संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची
स्थापना करणेबाबत.
५३
जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गातील
लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करणेबाबत तपासणी व अभ्यास करुन
अहवाल सादर करण्यासाठी तज्ञ समिती गठित करणेबाबत.
५४
ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा
परिषदेकरिता मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम करण्यासाठी समिती गठीत
करणेबाबत.
५५
भूजलाशयीन/ निमखारे मत्स्यव्यवसायाशी
निगडित समस्या/अडचणीवर उपाययोजना सुचविण्याकरिता सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरावर
समिती गठित करणेबाबत
५६
नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायाशी
संबंधित अडचणींबाबत समिती गठित करण्याबाबत.
५७
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जिल्हा
परिषदेच्या ताब्यातील भुखंड बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर विकासित करण्यानुषंगाने
कामाची सखोल चौकशी करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबत...
५८
उच्च शिक्षण संचालनालयाच्या
आस्थापनेवरील विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) व सहसंचालक प्रशासन या पदाचा
अतिरिक्त कार्यभार सोपविण्यासाठी निवड समिती गठीत करण्याबाबत.
५९
राज्याचे सांस्कृतिक धोरण २०10 चा फेरआढावा घेण्यासाठी समिती गठीत
करणेबाबत.
६०
सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय
वसतिगृहे व निवासी शाळातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा खरेदीसाठी
राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समिती गठीत करणेबाबत..
६१
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती या क्रीडा क्षेत्रातील
अग्रगण्य संस्थेच्या डीग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, अमरावती या महाविद्यालयास क्रीडा
विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने समिती नियुक्त करणेबाबत.
६२
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत
महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन/रुपरेषा निश्चित करण्यासाठी
मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणेबाबत.
६३
आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य,
पुणे या पदाच्या निवडीसाठी निवड समिती गठीत करणेबाबत.
६४
श्रीम. शैला सारंग, तत्कालिन सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड यांच्या विरुद्ध प्राप्त
तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समिती गठित करणेबाबत.
६५
गुड समेरिटन पुरस्कार योजनेचा आढावा
घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याबाबत.
६६
पर्यटन व सांस्कृतिक कार्य
विभांगातर्गंत ई-प्रशासन प्रकल्प राबविण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती गठित
करण्याबाबत.
६७
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील
गट-अ संवर्गातील पदांवर पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती गठीत
करणेबाबत.
६८
केंद्र सरकार पुरस्कृत स्वदेश दर्शन 2.0 सुकाणू समितीची (State Steering Committee) स्थापना
करण्याबाबत.
६९
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास
(जमिनीचे वाटप) विनियम, 1982 मधील
विनियम 16 खालील
शासनाच्या स्तरावर म्हाडाच्या निवासी/अनिवासी भूखंडाच्या वितरणाकरीता मंत्रिमंडळ
उपसमिती गठीत करणेबाबत.
७०
महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित
वस्रोद्योग धोरण 2023-28 साठी
उपाययोजना प्रस्तावित करणेसाठी समिती गठीत करणेबाबत
७१
जलसंपदा विभागांतर्गत गट-क मधील रिक्त
पदे भरण्याकरीता प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करण्याबाबत.
७२
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष
२०२३ राज्यात साजरे करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व कृती दल गठीत
करण्याबाबत.
७३
लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने
सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सुधारीत तरतुदीच्या अनुषंगाने
मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत.
७४
जिल्हा खनिज प्रतिष्ठान राज्यस्तरीय
संनियत्रण समितीचे गठण.
७५
राज्यात खाजगीरित्या व्यावसायिक
कुक्कुट पालन करणारे शेतकरी तसेच,
कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुट पालन व्यवसाय करताना
येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन
करण्याबाबत.
७६
राज्यस्तरीय रेशीम समन्वय समिती (SLSCC) व प्रकल्प
संनियंत्रण समिती (PMC) गठीत
करणेबाबत.
७७
राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुष्यमान
भारत योजनेंतर्गत उपकेंद्र (Sub
Centre) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) मध्ये जन आरोग्य समिती स्थापन करुन
कार्यान्वित करण्याबाबत....
७८
भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचा 15/25 वर्षे सेवा
किंवा वयाची 50 वर्षे
पूर्ण झाल्याानंतर आढावा घेणेबाबत समिती स्थापन करणे बाबत.
७९
Raising
and Accelerating MSME Productivity Programme (RAMP) या
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य RAMP कार्यक्रम समिती (State
RAMP programme committee) गठीत करण्याबाबत.
८०
राज्यातील पोलीस दलातील अधिकारी /
अंमलदार यांना घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने समिती
स्थापन करण्याबाबत.
८१
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते
योजनेतर्गत मंजुर आराखड्यातील शेत/पाणंद रस्त्यांच्या अंदाजपत्रकांची छानणी
करण्याकरीता छानणी समिती गठीत करण्याबाबत
८२
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या
योजनेंतर्गत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी
यंत्रणा/कार्यपद्धती व इतर निकषांत सुधारणा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती
गठित करण्याबाबत.
८३
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
चला जाणुया नदीला या अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत.
८४
पोलीस महासंचालक कार्यालयातील विधी
सल्लागार या पदावर पदोन्नती देण्यास पात्र असलेल्या विधी अधिकाऱ्यांची निवडसूची
तयार करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत.
८५
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या
अंतर्गत क्रीडा या विभागासाठी तातडीची खरेदी, मर्यादित निविदा /निर्बंधित निविदा/ स्विस चॅलेंज इत्यादी पद्धतीच्या
खरेदी प्रक्रियेसाठी उच्चाधिकार समिती गठीत करणेबाबत.
८६
महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव
साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समिती
गठीत करणेबाबत.
८७
माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या
आस्थापनेवरील गट-अ व गट-ब पदावर पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती गठीत
करणेबाबत...
८८
गोवर प्रतिबंध समिती (टास्क फोर्स)
गठित करण्याबाबत.
८९
जिल्हा नियोजन समिती अकोलासाठी
कार्यकारी समिती गठित करण्याबाबत
९०
शासकीय/अशासकीय तज्ञ व्यक्तींची महिला
विकास सल्लागार समिती गठीत करण्याबाबत...
९१
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)
अंतर्गत औरंगाबाद येथील प्रकल्पांसाठी समिती गठीत करणेबाबत..
९२
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर
संलग्न बाबींवरील शिफारशींवर कार्यवाही करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या
मंत्रिमंडळ उपसमितीला सहाय्य करण्याकरिता विशेष सल्लागार समितीची स्थापना
करणेबाबत.
९३
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन
करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
९४
दिनांक २६ सप्टेंबर, १९९५ च्या शासन निर्णयान्वये
राबविण्यात आलेल्या सैनिकी शाळांच्या धोरणाचे पुनर्विलोकन करून राज्यातील सैनिकी
शाळांकरिता सुधारित धोरणाचा मसुदा तयार करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत.
९५
दि. २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिनी, शासनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये
चित्ररथांचे परीक्षण करुन मुल्यांकन करून गुणांकन करण्याकरीता समिती गठीत
करण्याबाबत.
९६
दि. २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिनी, शासनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये
चित्ररथांचे संकल्पित चित्र उभारणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरीता समिती
गठीत करण्याबाबत.
९७
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) सार्वजनिक बांधकाम
विभागांतर्गत विद्युत शाखेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने
भरण्यासाठी राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची स्थापना करणेबाबत.
९८
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) सार्वजनिक बांधकाम
विभागांतर्गत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क
संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय
व प्रादेशिक निवड समितीची स्थापना करणेबाबत.
९९
सामान्य प्रशासन विभागातील रचना व
कार्यपध्दती उपविभागामध्ये ई-ऑफिस व संगणकीकरण इ. बाबी राबविण्याच्या अनुषंगाने
प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project
Implementation Committee) स्थापन करणेबाबत.
१००
पशुसंवर्धन विभागांतर्गत संस्थाना
आवश्यक औषधी, हत्यारे, अवजारे, उपकरणे, रंगद्रव्ये, रसायने, यंत्रसामुग्री, लस, पशुखाद्य, वैरणीची बियाणे, इत्यादी खरेदीसाठी राज्ययस्तरीय
प्रशासकीय खरेदी समिती, तांत्रिक
विर्निदेश (Technical
Specifications) ठरविण्यासाठी तांत्रिक विर्निदेश समिती व उपसमिती गठीत तसेच
खरेदीच्या अनुषंगाने कार्यप्रणाली विहित करण्याबाबत.
१०१
रात्र शाळांबाबत सर्वंकष धोरण निश्चित
करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत.
१०२
रात्र शाळांबाबत सर्वंकष धोरण निश्चित
करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत.
१०३
मुंबई परिसरातील विद्युत पुरवठा व
प्रसारण प्रणाली मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या समस्यांचे
निराकरण करण्यासाठी मुख्य सचिव,
महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत.
१०४
राज्य गॅझेटिअर मालिकेत मराठी संगीत
रंगभूमी या विषयावर गॅझेटिअर प्रकाशित करण्याकरीता मुख्य समिती स्थापन करणेबाबत.
१०५
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)
अंतर्गत औरंगाबाद येथील प्रकल्पांसाठी स्थळ पाहणी व घरकुले निश्चितीकरण आणि आर्थिक
व्यवहार्यता तपासणीसाठी उप समिती गठीत करणेबाबत.
१०६
पंचगंगा नदी प्रदूषण निवारणासाठी सनियंत्रण
समिती स्थापन करण्याबाबत
१०७
शासकीय/अशासकीय व्यक्तींची आंतरजातीय /
आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय) गठीत करण्याबाबत...
१०८
राज्यातील पूर्ण झालेल्या कोल्हापूर
पध्दतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करणेबाबतची आवश्यकता व तांत्रिक निकष निश्चित
करणेकरिता समिती गठीत करणेबाबत....
१०९
आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे
सर्वेक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
११०
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) सार्वजनिक बांधकाम
विभागांतर्गत स्थापत्य शाखेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड
समितीची स्थापना करणेबाबत
१११
नागपूर जिल्हा नियोजन समितीसाठी
कार्यकारी समिती गठीत करण्याबाबत...
११२
शासकीय/अशासकीय
व्यक्तींची आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय) गठीत
करण्याबाबत
११३
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या
अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनेवरील,भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) व गट क
संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड
समितीची स्थापना करण्याबाबत-
११४
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर
ट्रान्सफॉर्मेशन-मित्र (Maharashtra
Institution for Transformation-MITRA) या संस्थेच्या कार्यकारी मंडळातील
मुख्य कार्यकारी अधिकारी व सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड करण्याकरिता
निवड समितीची स्थापना करणेबाबत.
११५
बृहन्मुंबई दुध योजनेअंतर्गत शासकीय
दूध योजना, वरळी
यांच्या जागेच्या वापराचे नियोजन करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.....
११६
शासकीय/अशासकीय व्यक्तींची आंतरधर्मीय
विवाह-परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय) गठीत करण्याबाबत...
११७
राज्यातील उर्वरित २८ जिल्हयातील
भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन करणे याकरीता जिल्हास्तरीय सुकाणू समिती व संनियंत्रण
समिती स्थापन करणे.
११८
मृद व जलसंधारण
विभागातील क्षेत्रिय आस्थापनेवरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या
संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्याबाबत
११९
मौजे पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे येथे दरवर्षी दि. 01 जानेवारी रोजी कोरेगांव भिमा विजयस्तंभ
शौर्य दिन साजरा करण्याकरिता प्रशासकीय सोयीसाठी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली
कायमस्वरुपी प्रशासकीय समिती गठीत करण्याबाबत...
१२०
भूमि अभिलेख विभागातील गट-क संवर्गातील
प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत
१२१
ऊर्जा संक्रमण (Energy Transition) उपायांना चालना
देण्यासाठी राज्य स्तरीय सुकाणू समिती गठीत करणेबाबत.
१२२
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची राज्यातील
अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत उपसमित्यांच्या अहवालातील शिफारशींच्या
अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेऊन येणा-या अडचणी निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी
व मार्गदर्शन करणेसाठी सुकाणू समिती स्थापन करण्याबाबत.
१२३
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासाठी
मंत्रिमंडळ उपसमितीचे गठन करण्याबाबत
१२४
रिट पिटिशन क्र.15033/2022 व रिट पिटिशन
क्र.15037/2022 या
प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.09.12.2022
रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत
करणेबाबत..
१२५
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत
होणाऱ्या कामांच्या व्याप्ती आणि कार्यपध्दती यामध्ये अध्ययन करून अधिक गतिमान
पध्दतीने कामे होण्याकरिता अभ्यास करून मार्गदर्शक तत्वांबाबत अंतिम निर्णय
घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत.
१२६
फळझाडांचा मोहोर, फुलोरा, पालवीचे वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या प्रकरणात नुकसानीचे
प्रमाण व मोबदला देणेकरीता कार्यपद्धती ठरविणे तसेच नुकसानी टाळण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
१२७
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिपत्याखालील
कार्यालयांच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने
भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करणेबाबत.
१२८
भूतपूर्व दुय्यम
सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) निबंधक
भागीदारी संस्था कार्यालय, महाराष्ट्र
राज्य, मुंबई व
त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची
स्थापना करणेबाबत.
१२९
राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक
तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यासाठी पणन विभागाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी
समिती गठित करण्याबाबत.
१३०
राज्यातील महानगरपालिकांचे आर्थिक
सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ञ समिती गठीत
करण्याबाबत.
१३१
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर
अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची शिफारस करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
१३२
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील
गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी निवड समिती स्थापन
करणेबाबत.
१३३
राज्यातील शासकीय व अशासकीय
महाविद्यालयांचे समूह महाविद्यालयात (Cluster of Colleges) रुपांतरण/निर्मिती करण्यासाठी विभाग
स्तरीय समिती स्थापन करणेबाबत.
१३४
महाराष्ट्रात
थेट विक्री करणाऱ्या कंपन्या आणि थेट विक्रेते यांच्या वरील देखरेख / पर्यवेक्षण
या करिता समिती गठित करण्याबाबत.
१३५
राज्यात बाईक (दुचाकी) टॅक्सी
वाहनांसाठी समुच्चयक धोरण तयार करण्यासाठी समिती गठित करणे.
१३६
मुंबईचे शेरिफ (नगरपाल) कार्यालयातील
गट-क व गट-ड च्या कर्मचा-यांच्या वयाच्या 50/ 55 व्या वर्षापलीकडे/ अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर त्यांच्या सेवा पुनर्विलोकन करण्याकरीता
समिती गठीत करण्याबाबत.
१३७
महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित
वस्रोद्योग धोरण 2023-28 साठी
उपाययोजना प्रस्तावित करणेसाठी समिती गठीत करणेबाबत
१३८
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या अनुषंगाने
उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन करणेबाबत.
१३९
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
आंतर विभागीय समिती गठीत करणेबाबत.
१४०
महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित
मधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत
वेतनश्रेणीअंतर्गत दिनांक 01/01/2016
ते 30/06/2021 या
कालावधीची वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत प्रस्तावाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ
उपसमिती गठित करण्याबाबत.
१४१
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर
नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत
१४२
ऑरीक सिटी औरंगाबाद येथे ड्रोन सिटी व
मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर स्थापन करण्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन
करणेबाबत...
१४३
जिल्हा नियोजन
समिती पुणेसाठी कार्यकारी समिती गठित करण्याबाबत
१४४
मुंबई इमारत
दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत संक्रमण शिबिराच्या तसेच बृहतसूचीमार्फत होणा-या
गाळयांचे वाटप करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्याकरिता समिती गठित
करण्याबाबत.....
१४५
भूतपूर्व दुय्यम
सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील गट-ड संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी प्रादेशिक निवड समितीची
स्थापना करणेबाबत.
१४६
मृद व जलसंधारण विभागातील क्षेत्रिय
आस्थापनेवरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) या
संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्याबाबत.
१४७
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ मधील
कलम ७ व कलम ८ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याकरिता समिती गठित करणेबाबत ...
१४८
महिला तक्रार निवारण समिती गठीत
करणेबाबत
१४९
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ मधील
कलम ७ व कलम ८ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याकरिता समिती गठित करणेबाबत ...
१५०
जलसंपदा विभागांतर्गत
गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करणेबाबत.
१५१
राज्य सागरमाला समितीची स्थापना
१५२
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन 2019-20,2020-21 व 2021-22 निवड समितीची
स्थापना करण्याबाबत.
१५३
महाराष्ट्र राज्याचे चक्रीय
अर्थव्यवस्था धोरण तयार करण्यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन
करणेबाबत......
१५४
निविदा मुल्यांकन समितीची (Tender Evaluation Committee) स्थापना
करण्याबाबत.
१५५
महाराष्ट्र राज्याचे नवीन लॉजिस्टीक
धोरण तयार करण्यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत......
१५६
राज्याचे नवीन
इलेक्ट्रॉनिक्स धोरण तयार करण्यासंदर्भात राज्य शासनास शिफारशी करण्याकरिता समिती
स्थापन करणेबाबत
१५७
राज्याचे नवीन अवकाश व संरक्षण क्षेत्र
उत्पादन धोरण तयार करण्यासंदर्भात राज्य शासनास शिफारशी करण्याकरिता समिती स्थापन
करणेबाबत
१५८
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिपत्याखालील
कार्यालयांच्या आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने
भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करण्याबाबत...
१५९
महाराष्ट्र कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व्यवसाय शिक्षण अनधिकृत संस्था व अनधिकृत पाठ्यक्रम (प्रतिबंध)
अधिनियम, 2013 यामध्ये
सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
१६०
किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी दि.
17 ते 21 फेब्रुवारी 2023 या कालावधीत शिवनेरी, जि.पुणे येथे श्री. छत्रपती शिवाजी
महाराज यांचा 393 वा
जन्मोत्सव - हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजनासाठी सनियंत्रण समिती गठीत
करण्याबाबत.
१६१
महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित वस्रोद्योग
धोरण 2023-28 साठी
उपाययोजना प्रस्तावित करणेसाठी समिती गठीत करणेबाबत.
१६२
वार्षिक योजना सन 2022-23 प्रचार, प्रसिध्दी व प्रशिक्षण (2406 8589) या
लेखाशीर्षांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या माध्यम आराखड्यानुसार पुढील
कार्यवाहीकरीता समिती गठीत करण्याबाबत.
१६३
स्थलांतरीत
कामगारांच्या समस्यांसाठी राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय
समिती व जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्थलांतर
समिती स्थापन करणेबाबत
१६४
वेर्स्टन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या ROBs च्या कामांकरीता विभागीय आयुक्त कोकण
यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती गठीत करणेबाबत.
१६५
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
संगणकीकरण व आधुनिकीकरण, ई
प्रशासन धोरण इ. ची अंमलबजावणी याकरिता प्रकल्प अंमलबजावणी समितीची स्थापना
करण्याबाबत.....
१६६
मराठी भाषेतील चित्रपट/ दूरदर्शन/
ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी ऑनलाईन पध्दतीने फिल्मबाजार पोर्टल तयार करणे व
त्यासाठी समिती गठित करण्याबाबत.
१६७
विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
समिती गठित करण्याबाबत.
१६८
Local
Government Directory (LGD Code) संदर्भात समिती गठित करणेबाबत.
१६९
कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना
यासाठी समिती गठित करण्याबाबत
१७०
ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग (खुद्द) साठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग (खुद्द) खरेदी समिती गठीत करण्याबाबत.
१७१
आपत्ती सौम्यीकरणासाठी प्रस्तावांचे
मुल्यमापन करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत समितीची स्थापना
१७२
क्षमता बांधणी आणि पुर्व तयारी यासाठी
प्राप्त प्रस्तावांचे मुल्यमापन करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणांतर्गत समितीची स्थापना
१७३
जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र
सरकारद्वारे धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प (DRIP-II) च्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीची स्थापना
१७४
एकात्मिक
प्रकल्प व्यवस्थापन (Unified
Project Management Unit-UPMU) कक्षांतर्गत शासन निर्णयांचे एकत्रीकरण
व सुसुत्रीकरण करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे
यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत.
१७५
सार्वजनिक
आरोग्य विभागांतर्गत राज्य कामगार विमा योजनेतील गट-अ मधील सर्व पदांवर
पदोन्नतीकरीता विभागीय पदोन्नती समिती गठीत करणेबाबत.
१७६
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या
योजनेंतर्गत मंजूर प्रकल्पातील घरकुलांच्या दरात सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव SLAC व SLSMC पुढे सादर करण्यापूर्वी त्याची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी
करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
१७७
जुन्या दर्जेदार दुर्मिळ नाटकांचे जतन
व संवर्धन करण्यासाठी नाटकांची निवड करण्याकरीता तज्ञांची उप समिती गठीत
करण्याबाबत.
१७८
राज्यातील
शेतकऱ्यांसाठी गाव तेथे गोदाम योजनेकरीता समिती गठीत करणेबाबत.
१७९
दिव्यांग कल्याण विभाग (खुद्द) साठी
लागणाऱ्या वस्तु / सेवांची खरेदी करण्यासाठी खरेदी समिती गठीत करण्याबाबत.
१८०
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील पदांचा
आढावा घेण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
१८१
राजगुरुनगर, जि. पुणे येथील हुतात्मा शिवराम हरी
राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास आराखडा समिती स्थापन करणेबाबत
१८२
राज्यातील तृतीयपंथीयांसाठी सर्वंकष
धोरण आखणे यासह विविध धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी/नवीन योजना, नियम तयार करण्यासाठी शिफारशी करणे इ.
साठी समिती स्थापन करण्याबाबत
१८३
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) सार्वजनिक बांधकाम
विभागांतर्गत गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी
राज्यस्तरीय समन्वय समितीची स्थापना करणेबाबत.
१८४
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी
निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
१८५
दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट करीता मा.राष्ट्रपतींच्या वतीने
जाहिर होणाऱ्या विविध अग्निशमन सेवा पदकांसाठी शिफारस करण्याकरीता समिती गठीत
करणेबाबत
१८६
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण
योजनेंतर्गत सद्यस्थितीतील पाककृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत
करण्याबाबत.....
१८७
प्रकल्प
अंमलबजावणी समितीची (Project
Implementation Committee) स्थापना करण्याबाबत
१८८
निविदा मुल्यांकन समितीची (Tender Evaluation Committee) स्थापना
करण्याबाबत
१८९
भूतपूर्व दुय्यम
सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील)
जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची
स्थापना करणेबाबत.
१९०
भूतपूर्व दुय्यम
सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील)
जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (विद्युत) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची
स्थापना करणेबाबत.
१९१
भूतपूर्व दुय्यम
सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील)
जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील
नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची
स्थापना करणेबाबत.
१९२
मानव-बिबट संघर्षावर उपाययोजना
सुचविण्यासाठी मा. विधान सभा सदस्यांची समिती गठीत करण्याबाबत.
१९३
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी
प्राधिकरण अधिनियम 2023 (2023 चा 13) अंतर्गत नियम/ विनियम करण्यासंदर्भात
मसुदा समिती गठित करण्याबाबत.
१९४
महाराष्ट्र
इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021
अनुषंगाने मागणी विषयक प्रोत्साहने वितरीत करण्याबाबतची समिती गठीत करण्याबाबत.
१९५
अनुसूचित जमाती व इतर पांरपारिक
वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ ची
अंमलबजावणी अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांची गा.न.नं. ७/१२ सदरी भोगवटादार वर्ग २
(नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनी) अशी नोंद घेणेबाबत मा. मंत्री (महसूल)
यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्ती करण्याबाबत.
१९६
नोंदणी अधिनियम, 1908 च्या कलम 21 व 22 मध्ये सुधारणा करण्यासाठी शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठित करणे
बाबत
१९७
Sustainable
Alternative Towards Affordable Transportation (SATAT) योजनेचे
प्रवर्तन करण्याकरीता राज्य स्तरीय समन्वय समितीची स्थापना करणेबाबत.
१९८
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील
गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी निवड समिती स्थापन
करणेबाबत.
१९९
राज्यात शैक्षणिक आणि आरोग्य सेवा
केंद्र स्थापन करण्यासाठी धोरणात्मक फ्रेमवर्कची शिफारस करण्याकरिता समिती स्थापन
करण्याबाबत.
२००
दिव्यांग कल्याण विभाग तसेच क्षेत्रिय
कार्यालयांच्या संगणकीकरणासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती गठीत करण्याबाबत.
२०१
अमृत संस्थेव्दारे राबविण्यात येणा-या
योजनांच्या अमंलबजावणीसाठी तसेच,
अमृत संस्थेच्या कार्यालयीन खरेदीसाठी खरेदी समिती गठीत करण्यास
मान्यता देण्याबाबत.
२०२
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जिल्हा
परिषदेच्या ताब्यातील भुखंड बांधा-वापरा- हस्तांतरीत करा या तत्वावर विकासित
करण्यानुषंगाने कामाची सखोल चौकशी करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबत...
२०३
प बेस वाहनांसाठी Maharashtra Regulation of The Aggregators
Rules, 2022 तयार करण्यासाठी समिती गठित करणे.
२०४
इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर लि.या
प्रकल्पास सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत विशाल प्रकल्पाचा दर्जा देण्याच्या
अनुषंगाने समिती स्थापन करणेबाबत.
२०५
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता
कक्षाकडे अर्थसहाय्याची मागणी करणाऱ्या अर्जांची छाननी /तपासणी करण्यासाठी समिती
गठीत करण्याबाबत..
२०६
सामान्य प्रशासन विभागाच्या
अधिपत्याखालील उपाहारगृहातील आकृतीबंधानुसार रिक्त पदांची पदभरती करण्यासाठी समिती
गठीत करणेबाबत
२०७
विभागीय
पदोन्नती समिती गठित करण्याबाबत.......
२०८
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार
राज्यातील सहकार चळवळ बळकट करणे तसेच सहकार चळवळ तळागळातील लोकांपर्यंत
पोहोचविण्यासाठी राज्य सहकार विकास समिती (SCDC) आणि जिल्हा सहकार विकास समिती (DCDC) ची स्थापना करणे.
२०९
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत
कृत्रिम रीफ राज्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्त (मत्स्यव्यवसाय) यांच्या
अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित करण्याबाबत.
२१०
शासकीय/अशासकीय तज्ञ व्यक्तींची बाल
विकास सल्लागार समिती गठीत करण्याबाबत.
२११
प्रस्तावित धरणस्थळी मुख्यमाती
धरणाऐवजी साखळी सिमेंट बंधारे /को.प.बंधारे घेणेविषयक अहवाल सादर करणेसाठी समिती
गठीत करणेबाबत.
२१२
महाराष्ट्र भुषण पुरस्कार-2022 वितरण सोहळा दुर्घटना- एकसदस्यीय समिती
गठीत करण्याबाबत
२१३
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती संचलित डीग्री कॉलेज ऑफ फिजीकल
एज्युकेशन, अमरावती
या महाविद्यालयास अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने समिती
गठीत करणेबाबत.
२१४
आरे दुग्ध वसाहतीचा सर्वंकष विकास
करण्याच्या दृष्टीने उपयायोजना करण्यासाठी समिती करणेबाबत
२१५
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ मधील
कलम ७ व कलम ८ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याकरिता समिती गठित करणेबाबत ...
२१६
दिव्यांग कल्याण विभागामध्ये महिला
तक्रार निवारण समिती गठीत करणेबाबत.
२१७
राज्यातील विविध प्रकाराच्या उदंचन
जलविद्युत योजनांचे विकसन, विहीत
आयुर्मान पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरणातून नूतनीकरण व
आधुनिकीकरण तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या 25मे.वॅ.क्षमतेपर्यंतच्या लहान जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरणांतर्गत
विकसन धोरणात सुधारणा, या
तीन धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यपद्धती तसेच मार्गदर्शक तत्वे
तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत.
२१८
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या राज्यातील
अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत उपसमित्यांच्या अहवालातील शिफारशींच्या
अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेऊन येणा-या अडचणी निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी
व मार्गदर्शन करणेसाठी सुकाणू समिती स्थापन करणेबाबत.
२१९
राज्यातील
शासकीय गोदामांमध्ये अन्नधान्याच्या हाताळणूकीसाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदी
करण्यासाठी विभागीय भांडार खरेदी समिती स्थापन करण्याबाबत
२२०
महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत
महोत्सवी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत बांबू वृक्ष लागवडी संदर्भात समिती गठीत
करणेबाबत.
२२१
शिवभोजन योजनेच्या देयकांबाबत मानक
कार्यप्रणाली ( SOP) निश्चित
करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.
२२२
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील
क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनेवरील, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) , गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने
भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करणेबाबत.
२२३
शासकीय भुखंडाचा खाजगीकरणातून व्यापारी
तत्वावर विकास करवायाच्या परिपत्रकामध्ये / धोरणामध्ये बदल / सुधारणा करुन नव्याने
शासन धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत
२२४
जलसंपदा विभागाअधिनस्त क्षेत्रिय
कार्यालयातील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबीसंदर्भात
सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
२२५
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि
सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0
अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2021 नुसार राज्यस्तरीय तांत्रिक समिती (SLTC) व जिल्हा पाणलोट
कक्ष व माहिती केंद्र(WCDC) गठित
करणेबाबत
२२६
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि
सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0
अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2021 नुसार राज्यस्तरीय मान्यता समिती (SLSC) व नोडल यंत्रणा
( SLNA)गठित करणेबाबत.
२२७
Strengthening
of Tertiary Care and Medical Education in Maharashtra या प्रकल्पासाठी
शासन स्तरावरील नियंत्रण यंत्रणा म्हणून मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली
सुकाणू समिती गठीत करणेबाबत ....
२२८
सांस्कृतिक
कार्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या दर्शनिका विभाग, मुंबई या क्षेत्रिय कार्यालयाच्या गट-क मधील शासकीय कर्मचाऱ्यांना
गट-ब मध्ये पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची स्थापन करणेबाबत.
२२९
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक
वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व
सुधारणा नियम 2012 ची
अंमलबजावणी अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांची गा.न.नं. 7/12 सदरी भोगवटादार वर्ग 2 (नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या
जमिनी) अशी नोंद घेणेबाबत मा. मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती
नियुक्ती करण्याबाबत..
२३०
गिरणी
कामगारांची पात्रता तपासणे, सोडत
काढणे, सोडतीत यशस्वी
ठरलेल्या गिरणी कामगारांना घरांचा / सदनिकांचा ताबा वेळत मिळणे या बाबींवर
संनियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
२३१
बारव पुर्नरुज्जीवन तसेच स्थापत्याचे
जतन संवर्धनासाठी तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली बारव संवर्धन समिती गठित करणेबाबत
२३२
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक
उपाययोजना अधिनियम, 2006 मध्ये
सुधारणा केल्यानुसार नियम तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
२३३
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयाकरिता नवीन इमारतीचे बांधकाम
करण्याच्या अनुषंगाने कल्पना स्पर्धा (Ideas Design Competition) राबविण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
२३४
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील उप
आयुक्त (गट-अ) सहायक आयुक्त (गट-अ) आणि कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन
अधिकारी (गट-ब) या संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची
स्थापना करण्याबाबत..
२३५
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ५३३४
आकृतीबंधातील शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण मधील
घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करणेबाबत.
२३६
शासकीय विद्युत कंपनींना ग्राम पंचायत
क्षेत्रात कर माफी देणेसंदर्भात शासनास अभिप्राय देणेकामी समिती स्थापन करणेबाबत
२३७
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)
च्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आणणे व सुधारणा करण्याच्या अनुषंगाने त्रिसदस्यीय
समिती गठीत करण्याबाबत...
२३८
मराठवाडयातील
मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसुत्रता येण्यासाठी व
यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी / शिफारशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल)
यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..
२३९
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदंर्भात
अभ्यास समिती गठित करणेबाबत.
२४०
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत
ई-ऑफीस प्रणाली व संगणकीय साहीत्य लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खरेदी
समिती गठीत करण्याबाबत व खरेदी अधिकारी निश्चित करण्याबाबत.
२४१
राज्यातील न्यायालयांकरीता पायाभूत
सुविधा निर्माण करणे, त्यात
वाढ करणे व त्या अंमलात आणणे याकरीता राज्यस्तरीय समिती स्थापन करणे.
२४२
राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे
घेण्यासाठी सरकारी वकील किंवा सहायक सरकारी वकील यांना सूचना/ शिफारस करण्याकरिता
मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत.
२४३
राज्यातील विनाअनुदानित खाजगी
तंत्रनिकेतने आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न संस्था याद्वारे
चालविण्यात येणाऱ्या तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांची फी निश्चिती करण्यासाठी
समिती गठीत करण्याबाबत..
२४४
सामान्य प्रशासन विभाग/
राजशिष्टाचारच्या अधिपत्याखालील शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील आकृतिबंधानुसार
रिक्त पदांची पदभरती करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.
२४५
महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक कला व क्रीडा
क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटांना सहाय्यक अनुदान
देण्याबाबत सुधारीत नियम/अटी निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
२४६
सामान्य प्रशासन विभाग/
राजशिष्टाचारच्या अधिपत्याखालील शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील विविध संवर्गांचे
सेवा प्रवेश नियम अद्ययावत करणेसाठी समिती गठीत करणेबाबत.
२४७
ग्राहक संरक्षण अधिनियम-2019 अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण
आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी
शासनास शिफारस करण्यासाठी निवडसमिती गठित करणेबाबत..
२४८
कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण
या नियोजित प्राधिकरणाची रचना, स्वरुप
व संदर्भ अटी इ. ठरविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणेबाबत.
२४९
राज्याचा डिजिटल कम्यॅुनिकेशन रेडिनेस
इंडेक्स (DCRI) सुधारण्यासाठी
आंतर विभागीय समितीची स्थापना करण्याबाबत.
२५०
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळ
(प्रतिबंध, मनाई
व निवारण) अधिनियम 2013
मधील तरतूदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याबाबत..
२५१
आपत्कालीन वैद्यकिय प्रतिसाद सेवा
योजनेकरीता सेवापुरवठादाराची निवड करण्याकरीता निविदा समितीची स्थापना.
२५२
निवडणूक संबंधित सॉफ्टवेअर तयार
करण्यासाठी सल्लागार नेमण्याकरिता प्रकल्प अंमलबजावणी समितीची स्थापना करण्याबाबत
२५३
भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था
(प्राथमिक), मच्छिमार
विविध कार्यकारी सहकारी संस्था,
जलाशयावर निर्माण करावयाचा संघ व भूजलाशयीन जिल्हा मच्छिमार संघ
नोंदणीसाठी सुधारित धोरण तयार करणेकरिता शासनास शिफ़ारशी सादर करण्यासाठी समिती
गठित करणेबाबत.
२५४
मिशन वात्सल्य योजनेंतर्गत
जिल्हास्तरीय प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजूरी समिती Sponsorship and Foster Care Approval
Committee (SFCAC) गठीत करण्याबाबत.
२५५
मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल रिट याचिका
क्र. 128/2018
संदर्भात मुरलीधर स्वामी देवस्थान विरुध्द जिल्हाधिकारी, नागपूर व इतर या प्रकरणी दिलेल्या दि.27.04.2023 व दि. 02.05.2023 च्या
न्यायालयीन निर्णयानुसार प्रधान सचिव (वने, भूसंपादन), महसूल
व वन विभाग यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करणेबाबत.
२५६
आपत्कालीन वैद्यकिय प्रतिसाद सेवा
योजनेकरीता सेवापुरवठादाराची निवड करण्याकरीता निविदा समितीची स्थापना.
२५७
जिल्हास्तरीय वेटलँड सनियंत्रण समिती
स्थापन करण्याबाबत
२५८
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या
कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील
गट-ब (अराजपत्रित), गट-क
व गट-ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत.
२५९
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार
समितीमधून दि.25.05.1967
नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवानिवृत्त वेतनाचा लाभ
प्रदान करण्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता अभ्यास समिती गठीत करण्याबाबत...
२६०
जिल्हा नियोजन समिती वर्धासाठी
कार्यकारी समिती गठित करण्याबाबत
२६१
राज्यातील दूध दर निश्चित करण्यासाठी
समिती गठीत करण्याबाबत
२६२
नियोजन विभागांतर्गत महिला तक्रार
निवारण समिती पुनर्गठित करणेबाबत.
२६३ वेबसाईट विकसित करण्याच्या प्रकल्पावर संनियंत्रण करुन निर्णय घेण्यासाठी विभाग स्तरावर समिती गठीत करणेबाबत.
२६४ दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत
RTI Katta
Vijay Kumbhar
RTI Resource Person, RTI Columnist
Phone 9923299199
Website - http://vijaykumbhar.com
Blogs
- https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/
- https://vijaykumbhar.blogspot.com/
- http://surajya.org/
email admin@vijaykumbhar.com
kvijay14@gmail.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter - https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/vijaykumbhar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा