बिबवेवाडी येथील व्यापारी आणि त्याच्या भाचीने दाखल केलेल्या स्वतंत्र खासगी तक्रारींबाबत सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दरोडे जोग आणि त्यांच्या दोन गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण (एमपीआयडी) कायद्यांतर्गत आणि फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.फडणीस प्रॉपर्टिज आणि डी एस कुलकर्णी डेव्हलपर्सनंतर गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेले ते पुण्यातील तीसरे प्रमुख बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. तसे पुणे आणि जिल्ह्यात अनेक बांधकाम व्यावसायिकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.
डी एस कुलकर्णी यांच्या गुंतवणूकदारांप्रमाणेच ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांनी आपली आयुष्यभराच्या कष्टानंतर मिळवलेले सेवानिवृत्ती लाभ दारोडे जोग प्रवर्तक फर्म यांच्याकडे गुंतविले. खरं तर इथेही गुंतवणूकदारांना आमिष दाखवले गेले,गुंतवणूक करण्यास प्रेरित केले गेले.अनेकदा ब्रोकर कम इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट यांनी दरोडे जोग यांच्याकडे मुदत ठेवींवर भरमसाठ व्याज दर देण्यात येत असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.ज्येष्ठ नागरिक हे या लोकांचे सॉफ्ट टार्गेत असतात. मात्र एकट्या डीएसके प्रकरणात सुमारे १४ ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांचा मृत्यू झालायं हे भायानक वास्तव विसरून चालणार नाही.
मार्च २०१७ पर्यंत गुंतवणूकदारांच्या मनात कधीही आपल्या ठेवी धोक्यात असल्याची शंका आली नाही कारण तोपर्यंत ठेवींवरील व्याज मिळत व्यवस्थित मिळत होते. मात्र मार्च २०१७ मध्ये दरोडे जोग यांनी अचानक ठेवीवरील व्याज देणे थांबवले. व्याजापोटी तसेच परिपक्वतेच्यामुदत ठेवींच्या रकमेची परतफेड करण्यासाठी दिलेले धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत जाउ लागले., त्यासंदर्भात टेलिफोनिक विनंत्या आणि त्यानंतर दरोडे जोगच्या ऑफिसला पत्रे आणि वैयक्तिक भेट देऊनही गुंतवणूकदारांनअ कोणताही प्रतिसाद मिळेणासा झाला. दरोडे जोग यांच्या कर्मचार्यांनी गुंतवणूकदारांना अक्षरश: भिका-यासारखे वागवायला सुरूवात केली.
दरोडे जोग यांनी मागील दोन वर्षात आपल्यावरील संकट टाळण्याचा प्रयत्न केला.परंतु तसे करताना गुंतवणूकदारांना मात्र त्यांनी कमालीचे दुखावून ठेवले.आता ते सामान्य गुंतवणूकदारांना त्यांची परतफेड करून आपल्यावरील संकट सौम्य करतात की डी.एस. कुलकर्णी यांच्या मार्गाने जातात हे लवकर कळेलच. मात्र दरोडे जोग यांच्या रुपाने पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या विश्वासाला तडा गेला आहे एवढे मात्र निश्चित. दरोडे जोग यांच्याकडे एका ज्येष्ट नागरिकाने आपल्या दिव्यांग मुलीच्या भविष्यासाठी म्हणून फक्त ४०,०००/- ( चाळीस हजार रुपये फक्त ) एवढी गुंतवणूक केली आहे. त्यांना सुरुवातीला काहीच रक्क्म मिळाली नाही. ते ग्रहस्थ माहिती अधिकार कट्ट्यावर आल्यानंतर त्यांना मी एक पत्र लिहायला सांगीतले. त्यानंतर त्यांना अवघे १५,०००/- ( पंधरा हजार रुपये परत मिळाले ) यावरून परिस्थितीचे गांभिर्य लक्षात यावे.
Related Stories
Subscribe for Free
To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
Vijay Kumbhar
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com
http://surajya.org/
Email – admin@vijaykumbhar.com
kvijay14@gmail.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter - https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/user/kvijay14
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा