दर्जाहीन
काम आणि वाढीव बिले सादर करण्यासंदर्भात दोषी ठरण्यात आलेल्या ठेकेदाराला पालिकेने
पुन्हा नोंदणी दिली आहे. नितिन वरघडे या ठेकेदाराला पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण
सभेने दर्जाहीन कामे आणि वाढीव बिले सादर करण्यासंदर्भात दोषी ठरवून तीन वर्षांसाठी
निलंबित केले होते. वरघडे यांना पालिकेने सुमारे ६९८ कामे त्या काळात दिली होती. निलंबनाच्या
कालवधीत वरघडे यांच्या आईच्या कंपनीत भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांनी
भागीदारी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पालिकेच्या
चौकशी समितीने वरघडेच्या कामांबाबत अहवाल सादर केला होता.तत्कालीन
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सदर ठेकेदाराच्या कामांची चौकशी केली केली
होती. अर्थातच सौम्य अहवाल सादर करावा किंवा चौकशी गुंडाळावी यासाठी बकोरिया यांच्यावर
सर्वपक्षिय दबाव होता. मात्र कोणत्याही दबावाला बळी पडता त्यांनी आपली चौकशी पूर्ण
केली होती. अर्थात त्याची किंमत लवकरच बकोरिया यांना चुकवावी लागली. त्यांना पुणे पालिकेतून
हलविण्यात आले.
वरघडे
यांना २०१४ ते २०१७ या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. आश्चर्य म्हणजे या निलंबनाच्या
कालवधीत वरघडे यांनी आईच्या नावावर एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीत भारतीय जनता
पक्षाचे विद्यमान आमदार योगेश् टिळेकर भागीदार आहेत. वरघडे यांनी जरी आईच्या नावावर
कंपनी स्थापन केली असली तरी सर्व कारभार स्वता: वरघडे बघत होते हे त्यांनी कंपनी नोंदवताना
दिलेल्या स्वत:च्या इमेलवरून सिद्ध होते. आता ज्या ठेकेदाराला पुणे महापालिकेने निलंबित
केले त्याच्याशी आमदारांनी भागीदारी का केली हे त्या आमदारांनाच माहित.
वरघडेंना
पुन्हा पालिकेत नोंदणीकृत ठेकेदार म्हणून प्रवेश मिळाला असला तरी त्यांना ज्या कारणासाठी
निलंबित करण्यात आले होते , म्हणजे दर्जाहिन कामे करणे वगैरे त्या कामांचा दर्जा सुधारून
घेण्यात आला का ?, दर्जाहीन कामे केली असतानाही ज्या अधिका-यांनी त्यांची बिले मंजूर
केली त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली किंवा जी वाढीव बिले सादर केली होती ती बिले
मंजूर करणा-यांवर काय कारवाई करण्यात आली या बाबी गुलदस्त्यातच आहेत.
वरघडेंना
निलंबित करताना पालिकेतील सरव पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रचंड तोंडसुख
घेतले होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकही अग्रेसर होते. ते नगरसेवक आता आपल्याच
पक्षाच्या आमदारांना दोषी ठेकेदाराशी भागीदारी केल्याबद्दल जाब विचारणार का?
निलंबन
संपल्यानंतर ज्या तत्परतेने वरघडेंना पुन्हा नोंदणी देण्यात आली त्यावरून त्यांचे निलंबन
हे नाममात्र आणि केवळ देखावा होता हे सिद्ध होते.वरघडेंना मार्च २०१८ मध्ये पुन्हा
नोंदणी देण्यात आली आहे.
Subscribe for Free
To receive free emails or free RSS
feeds, please, subscribe
to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA is a platform to empower
oneself through discussions amongst each other to solve their problems by using
Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model
Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://vijaykumbhar.com _
Email – admin@vijaykumbhar.com
Facebook - https://www.facebook.com/kvijay14
Twitter
- https://twitter.com/Vijaykumbhar62
YouTube - https://www.youtube.com/vijaykumbhar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा