विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: अखेर डीएसकेंवर गुन्हा दाखल

Saturday, October 28, 2017

अखेर डीएसकेंवर गुन्हा दाखल

अखेर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी .एस कुलकर्णी उर्फ डीएसके, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर ठेविदारांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण ( एमपीआयडी) कायद्याचे कलम ३ आणि ४ व भारतीय दंड विधान ४२०, ४०६ , ४०९ व १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ठेविदार जितेंद्र   मुळेकर यांनी सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मागील अनेक दिवस डीसकेंनी ठेविदारांचे पैसे बुडवल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. मात्र डीएसकेंनी खोटी आश्वासने देउन त्यांना थोपवले होते. मात्र अखेर आज गुन्हा दाखल झाला.

या संपूर्ण प्रकरणाची हकिकत अशी.

डीएसकेंची मूळ कंपनी डी. एस कुलकर्णी डेवलपर्स लिमिटेड (डीएसकेडीएल) ही सेबीकडे नोंदणीकृत पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनी व्यतिरिक्त डीएसकेच्या कुटुंबातील व्यक्तींनी इतर जवळपास ३० कंपन्या स्थापन केल्या.त्यातील काही कंपन्या या  प्रायव्हेट लिमिटेड किंवा भागीदारी संस्था होत्या. या कंपन्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी नव्हती. तरीही सुमारे आठ हजार ठेविदारांचा ठेवी या कंपण्यांनी स्विकारल्या. या ठेविदारांना मागील अनेक महिने मुद्दल सोडा साधे व्याजदेखील मिळालेले नव्हते त्यामूळे ठेविदार हवालदिल झाले होते.

या ठेविदारांकडून डीएसकेंच्या कंपन्यांनी ठेवी स्विकारण्याची परवानगी नसतानाही शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी स्विकारल्या. सुमारे ८००० ठेविदारांनी या कंपन्यांमध्ये सुमारे ८०० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी ठेवल्या असाव्यात असा अंदाज आहे.

डीएसकेंनी आतापर्यंत आपल्याकडे भरपूर जमीनी असून त्या विकल्या की ठेवीदारांचे पैसे देउ असा कांगावा केला होता. परंतु डीएसकेंच्या सर्व मालमत्तांवर विविध बँकाची सुमारे १५०० कोटी रुपयांची कर्जे असल्याने या सर्व मालमत्ता विकल्या तरी बँकाची देणी ३० % सुद्धा फिटणार नाहीत.मूळात या बँकानी इतकी कर्जे कशाच्या आधारावर दिली हाच एक मोठा प्रश्न आहे. 

त्याशिवाय आधी घर नंतर पैसे योजनेत डीएसकेंनी घर खरेदी करणा-यांच्या नावावर घराच्या एकूण रकमेच्या ९० % जास्त रक्कम उचलली मात्र त्या पैशातून १०% सुद्धा बांधकाम केले नाही. शिवाय घर मिळेपर्यंत कर्जाच्या रकमेच्या हफ्ता डीसके भरणार होते तोही न भरल्याने त्या योजने घर घेणा-यांची अवस्था घरही नाही आणि कर्जाचा हफ्ताही पगारतून कापला जातोय अशी झाली. ज्यांनी कर्जाच्या हफ्त्याएवढी रक्क्म बँकेत ठेवली नाही त्यांचे सिबिल रेटींग खराब झाले आहे. त्या प्रकरणही लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Related Stories

Is DSK exploiting Investors, FD holders and flat buyers ?

DSKDL public Limited Company or Criminal Enterprise?

डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार ?

डीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का ?

डीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ

डीएसके, फ़डणीस, टेंपलरोज गुंतवणूक घोटाळे म्हणजे सामूहिक गुन्हेगारीचा प्रकार ......खांदेपालटानंतर अवघ्या चोविस तासात डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सला नोटीस, डिबेंचर धारकांचे पैसे तातडीने द्या अन्यथा ……


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com2 comments:

  1. Great news! Congratulations, Kumbhar Saheb!! Credit goes to you!!! It was you who unearth the scam. It was you who insisted on prosecuting DSK under MPID Act. It was only you who was fighting for the F D Holders. Thanks for your investigative journalism, legal knowledge and guidance. This has become possible only because of you. Congratulations!

    ReplyDelete
  2. असे अनेक लोक व कंपनी आजही करत आहेत ,अनेकांचे पैसे ह्याचे मूळे दुबले आहेत,मी सुद्धा माझ्या एका मित्राला असेच पैसे दिले आहेत,त्याचा चेक सुद्धा माझेकडे आहे पण साधारण माणूस काय करणार,

    ReplyDelete