प्रधानमंत्री आवास योजनेतील कर्ज आधारीत् व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरे देण्याच्या आमिषाने हजारो लोकांकडून करोडो रुपये उकळणा-या मॅपल ग्रुपने आपल्या जाहीराती मागे घेतल्या, लोकांचे पैसे परत दिले ,मॅपल ग्रुपच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.तरीही काही चलाख बांधकाम व्यावसायिकांनी लोकांना गंडवण्याचा उद्योग राजरोसपणे चालू ठेवला आहे. फरक इतकाच की आता त्यांनी जाहीराती करण्याऐवजी सोशल मिडियाच्या माध्यमातून हा उद्योग आरंभला आहे..या योजनेच्या माध्यमातून लोकांना गंडवून पैसे मिळवण्याची क्षमताच इतकी मोठी आहे की हे चोर बांधकाम व्यावसायिक आपला उद्योग सोडायला तयार नाहीत्. त्यातच शासनानेही याबाबतीत बोटचेपे धोरण अवलंबले असल्याने या चोरांचे आणखी फावले आहे.
खरेतर कर्ज आधारीत् व्याज अनुदानाच्या माध्यमातून केवळ त्या शहरातील रहिवाशांनाच , तेही फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील व्यक्तिंना आणि ज्यांच्याकडे देशात कुठेही घर नाही अशाच व्यक्तिंना फक्त घरे मिळू शकतात, दुस-या शहरातील रहिवाशांना नाही. असे असले तरी मॅपलच्या जाहीरातींतील शब्दरचनेला राज्याच्या वेगवेगळ्या शहरातील नागरिक भुलले .अगदी लातूर, चंद्रपुर् , रत्नागीरी या भागातील लोकांनीच नव्हे तर अगदी अनिवासी भारतीयांनी देखील आपल्या पुणे ,महाबळेश्वर , पाचगणी किंवा लोणावळा येथे स्वस्तात घर मिळेल या आमिषाने ५-५ अर्ज भरले.अनिवासी भारतीय जर बेशरमपणे अशा योजनेचा गैरफायदा घ्यायला पुढे सरसावत असतील त्याला काय म्हणायचे?
या योजनेत केवळ ख-या गरजूना घरे मिळावित आणि त्यांना कर्ज फेडणे सुलभ व्हावे या हेतूने काही अटी टाकल्या आहेत. मात्र नतद्रष्ट खाजगी अर्थ पुरवठा संस्था आणि बांधकाम व्यावसायिक यांनी गरिबांना लुटण्याच्या एकापेक्षा एक अशा फसव्या योजना आखल्या असून कधीतरी आपल्या स्वप्नातील घर होइल या आशेने गरिब या आमिषांना बळी पडत आहेत आणी शासन मात्र मूग गीळून गप्प आहे.
सदर योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांसाठी तीन लाख रुपये व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी सहा लाखापर्यंतच्या कर्जावर साडेसहा टक्के इतके व्याज अनुदान १५ वर्षासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आहेत्.या योजनेंतर्गत शहरी भागात ३५ तर ग्रामीण भागात २५ लाखांपर्यंतचे घर घेता येउ शकते. मात्र शासनाच्या सवलतीच्या दराने मिळणारे कर्ज म्हणजे सहा लाख रुपयांचे कर्ज वगळता उर्वरीत कर्ज हे बाजारभावाने घयावे लागणार आहे.म्हणजे घराची किंमत १५ लाख असेल तर त्यातील सहा लाख रुपये शासनाच्या सवलतीच्या दराने तर उर्वरीत कर्ज बाजारभावाने घ्यावे लागणार आहे. काही वित्त पुरवठा संस्थांनी सदर योजने अंतर्गत बाजारभावाने दिल्या जाणा-या कर्जाच्या व्याजाचा दर अव्वाच्या सव्वा वाढवून लूटमार सुरू केली आहे.
त्याचप्रमाणे या योजने अंतर्गत एकून उत्पन्नाच्या पन्नास ते साठ टक्के हफ्ता जाईल इतकेच कर्ज मिळू शकते. म्हणजे एखाद्याचे मासिक उत्पन्न दहा हजार असेल तर त्याला पाच ते सहा हजार रुपये महिना हफ्ता जाईल इतकेच कर्ज मिळू शकते. परंतू खाजगी वित्त पुरवठा संस्थांनी आता कर्ज घेणा-याची परतफेडीची क्षमता न तपासता वाट्टेल तीतके कर्ज द्यायला सुरूवात केली आहे. परिणामी परतफेड न करता आल्यास असे कर्ज घेणा-याचे घराचे स्वप्न अल्पजीवी ठरणार आहे.
त्याचप्रमाणे आता कोणीही लल्लू पंजू आपण पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कर्ज मिळवून देउ शकतो अशा जाहीराती करू लागले आहेत. मात्र शासनाने मान्यता दिलेल्या प्राथमिक़ वित्त पुरवठा संस्थाव्यतिरीक्त इतर कोणीही असे कर्ज देउ शकत नाही. शिवास अशा कर्जासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर तो अर्जदार अशा कर्जासाठी पात्र आहे की नाही हे पहाण्यासाठी राज्य शासनाने म्हाडाची स्टेट लेवल नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.आणि नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाटी शासन कोणतीही उपाय योजना करत नाही.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे तसेच या योजनेत समावेश न होऊ शकलेली सर्व जिल्हा मुख्यालये (सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस ऐवजी सावंतवाडी हा अपवाद वगळता) अशा राज्याच्या एकूण ५१ शहरांमध्ये ही योजना लागू आहे. ही शहरे खालीलप्रमाणे असून या शहरातील रहिवाशी असणा-या नागरिकांना फक्त त्याच शहरात पंतप्रधान आवास योजनेखाली सहा लाखांचे सवलतीच्या दराने कर्ज मिळू शकते.
पुणे - जुन्नर, शिरूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, पिंपरी चिंचवड, देहू रोड (कँटोमेंट), पुणे (कँटोमेंट),पुणे , खडकी (कँटोमेंट)), दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, इंदापूर
नंदुरबार - तळोदे, शहाडे, नंदुरबार, नवापुर
धुळे- शिरपूर - वरवडे, दोंडाइचा -वरवडे,धुळे
जळगाव - चोपडा, यावल्, फैझापूर, सावडा, रावेर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, भादगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर
बुलढाणा- जळगाव (जामोद), शेगांव , नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार
अकोला- तेल्हारा, अकोट, बाळापुर, अकोला, मुर्तीजापूर, पातुर
वाशीम- मांगरुळपुर, कारंजा, वाशीम, रिसोड
अमरावती- चिखलदरा, अंजनगाव, अचलपूर, चांदुरबझार, मोर्शी, वरुड, शेंदुर्जना, अमरावती, दर्यापूर बनोसा, चांदूर रेल्वे, दत्तापूर धामणगाव
वर्धा - आर्वी, सिंदी, वर्धा, पुलगाव, देवळी, हिंगणघाट
नागपूर - मोवाड, नारखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खप, रामटेक, काम्टी, काम्टी (कँटोमेंट), नागपूर, उमरेड
भंडारा - तुमसर, भंडारा, पौनी
गोंदिया - तीरोरा, गोंदिया
गडचिरोली - देसाईगंज , गडचिरोली
चंद्रपूर - वरोरा ,ब्रह्मपुरी ,भद्रावती ,चंद्रपूर , मुल ,बल्लारपूर , राजुरा
यवतमाळ -नेर ,यवतमाळ ,दारव्हा ,डिग्रज , पुसद , उमरखेड , घाटंजी , पांढरकवडा , वनी
नांदेड - किनवट ,हदगाव ,नांदेड वाघाला ,मुदखेड ,भोकर ,पेठ उमरी , धर्माबाद , कुंडलवाडी ,बिलोली , लोह ,कंधार ,मुखेड ,देगलूर
हिंगोली -हिंगोली ,कळमनुरी , वसमत
परभणी - सैळू ,जिंतूर ,परभणी , मानवत् ,पाथरी , सोनपेठ ,गंगाखेड ,पूर्णा
जालना - भोकरदन , जालना ,अंबड , परतूर
औरंगाबाद - कन्नड ,सिल्लोड , औरंगाबाद , औरंगाबाद (कँटोमेंट),खुलदाबाद , वैजापूर ,गंगापूर , पैठण
नाशिक - सटना ,मालेगाव ,नांदगाव ,मनमाड ,त्रिंबक , नाशिक ,देवळाली (कँटोमेंट) ,भगूर ,इगतपुरी ,सिन्नर ,येवला
ठाणे - डहाणू ,जव्हार ,पालघर ,वसई-विरार शहर ,मीरा -भायंदर ,ठाणे ,नवी मुंबई ,भिवंडी निजामपूर ,कल्याण -डोंबिवली ,उल्हासनगर ,बदलापूर ,अंबरनाथ
रायगड - उरण ,पनवेल ,माथेरान , कर्जत खोपोली ,पेन ,अलिबाग , मुरुड जंजिरा ,रोहा, अष्टमी , श्रीवर्धन , महाड
अह्मद्नगर - संगमनेर ,कोपरगाव् ,शिर्डी ,राहता पिंपळस ,श्रीरामपूर , पाथर्डी अहमदनगर ,अहमदनगर (कँटोमेंट), राहुरी , देवळाली प्रवरा ,श्रीगोंदा ,
बीड - गेवराई ,मंजलेगाव ,बीड ,केज , धारूर ,परळी ,अंबेजोगाई
लातूर - लातूर ,अहमदपूर ,औसा ,निलंगा ,उदगीर
उस्मानाबाद - परंडा ,भूम ,कळंब ,उस्मानाबाद ,तुळजापूर , नळदुर्ग , मुरूम ,उमरगा
सोलापूर - करमाळा ,कुर्डूवाडी ,बार्शी , सोलापूर , पंढरपूर ,सांगोले , मंगळवेढे , अक्कलकोट मैंदर्गी , दुधानी
सातारा - महाबळेश्वर ,पांचगणी ,वाई ,फलटण , म्हसवड ,रहिमतपूर ,सातारा ,कराड ,मलकापूर
रत्नागिरी - दापोली कॅम्प , खेड ,चिपळूण ,रत्नागिरी , राजापूर
सिंधुदुर्ग - कणकवली , मालवण वेंगुर्ला ,सावंतवाडी
कोल्हापूर - मलकापूर ,पन्हाळा ,वडगाव कसबा ,इचलकरंजी ,जयसिंगपूर , कुरुन्द्वाद ,कोल्हापूर , कागल , मुरगूड , गडहिंग्लज्
सांगली - उरण इस्लामपूर , आष्टा , विटा , तासगाव , सांगली मिरज कुपवाड
Related Stories
Subscribe for Free
To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा