पुणे शहरात सध्या गाजतो आहे तो महापालिकेच्या पदाधिका-यांनी सहकुटुंब केलेला कोरिया दौरा. या दौ-यात पदाधिका-यांनी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याच नातेवाइकांची वर्णी लावली होती. त्यावरून बराच गदारोळ झाला . अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या.असे दौरे म्हणजे केवळ एक देखावा असतो , अभ्यास दौ-यांच्या नावाखाली राजकीय पक्षांचे लोक सहली काढत असतात असे आरोप झाले. या दौ-यांचा शहराला काही उपयोग होत नसल्याने त्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले .आजतागायत अशा अभ्यास दौ-यांचा अहवाल कधीही देण्यात आला नव्हता .यावेळी मात्र बराच गहजब झाल्याने दौ-यात सहभागी झालेल्या एका अधिका-याने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे . या अहवालातून अशा दौ-यांच्या आयोजनाबाबतच्या काही शंका दूर होण्याऐवजी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. आश्चर्य म्हणजे या अहवालात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्या पदाधिका-यांच्या नातेवाइकांचा साधा उल्लेखसुद्धा नाही. त्यामुळे त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे पुणेकर नागरिकांनी ठरवायचे आहे. या अहवालात नेमके काय म्हटले आहे हे नागरिकांना समजावे म्हणून तो जसाच्या तसा खाली दिला आहे . वाचकांनी त्याचा योग्य तो अर्थ लावून आपले मत ठरवावे .
............................................................................................................................................
मा. महापालिका आयुक्त यांनी कोरीया देशाच्या दौ-यासाठी माझी शिफारस केली असुन त्या प्रमाणे सदर प्रवासासाठी आवश्यक खर्चासाठी र.रु. 1 लाख इतक्या रकमेस मा. स्थायी समितीची संदर्भीत ठराव क्र. 2 अन्वये मान्यता घेण्यात आली आहे.
मी. दि. 10/6/2013 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कोरीयासाठी पुणे मनपाच्या वाहनाने मुंबई विमानतळा पर्यंत गेलो. मुंबई येथे कोरियासाठी रात्री 11:00 वाजता विमान क्र .टि.जी. 318 या विमानाने बँकॅाक येथे निघालो आणि बँकॅाक ते सिओल (कोरीया) पर्यंत विमान क्र . टी.जी. 692 ने प्रवास केला. सिओल (कोरीया) येथे दि. 17/6/2013 रोजी रात्री. 3:00 वा पोचलो.
सिओल (कोरीया) या शहरात पोचल्यानंतर सुसँाग-गु महानगरपालिकेने व्यवस्था केलेल्या मीनी बसच्या सहाय्याने सुसँाग-गु च्या हॅाटेल मध्ये राहाण्यासाठी गेलो व तेथे रात्रिचा मुक्काम आम्ही सर्वानी केला. दि. 12/6/2013 रोजी सकाळी 10:00 वाजता सुसँाग-गु महानगपालिकेत करारासाठी मी मा. महापौर, सौ. वैशाली बनकर, मा. सभागृह नेते, श्री. सुभाष जगताप, माजी मा. स्थायी समिती अध्यक्ष, श्री. बाबुराव चांदेरे, मा. शिवसेना गट नेता, श्री. हरणावळ, मा. माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष, श्री. चेतन तुपे, मा. रिपब्लिकन पार्टी गट नेता श्री. सिध्दार्थ देडे व मनसे मा. नगरसेवक, श्री. किशोर शिंदे असे एकुण 13 लोक पुणे महानगरपालिकेच्या प्रतिनिधी म्हणुन सुसँाग-गु या महानगरपालिकेत उपस्थीत राहिले.
सुसॉंगगु महानगरपालिके मध्ये मा. महापौर, श्री. ली. जीन हुन यांनी पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. वैशाली बनकर आणि आम्हा सर्वांचे व्यक्तिगत हार्दिक स्वागत केले. या करारनाम्यासाठी उपस्थीत असलेल्या सुसॉंग-गु महानगरपालिकेचे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांचे परिचय मा. महापौर यांनी करुन दिला. या करारनाम्यासाठी सुसॉंग-गु शहराचे मा. चेअरमन, मा. उप महापौर, मा. व्यवस्थापक, आरोग्य विभाग, मा. व्यवस्थापक, सिटी मॅनेजमेन्ट ब्युरो, मा. अध्यक्ष (सोशल व्हेलफेआर कमिटी), मा. व्यवस्थापक, पब्लिक रिलेशन विभाग, इ. उपस्थीत होते.
पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. वैशाली बनकर अणि सुसँाग-गु महानगरपालिकेचे मा. महापौर, श्री. ली. जीन हुन या दोन्ही महापौरंा समोर करारनाम्याचा मसुदा वाचण्यात आला आणि या दोन्ही महापौरांनी सर्व अधिकारी व लोक प्रतिनिधी आणि सुसँाग-गु जिल्हातील पत्रकार व न्युज चॅनल यांच्या समोर मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली.
सदर करारात खालील मुद्दांचा प्रामुख्याने समावेश आहे.
1) या करारनाम्याच्या सहाय्याने दोन्ही शहरातील रहिवाशी शिक्षण, संस्कृती, औषध, आर्थिक व शहराच्या विकास या गोष्टींचा देवाण- घेवाण करु शकतील.
2) सदर करारनाम्याची मुदत 3 वर्ष असणार असुन सदर करारनामा दोन्ही शहर केव्हंाही 1 महिन्याच्या अगाऊ सुचना देऊन रद्द करु शकतात.
3) सदर करारनाम्यता केव्हाही बदल अथवा दुरुस्ती दोन्ही शहराच्या मान्यतेने करता येईल अशी अट टाकण्यात आली.
सदर करारनाम्यावर सह्या झाल्यानंतर दोन्ही शहराचे महापौर यांची या कराराबाबत मत प्रदर्शने करण्यात आला. सुसँाग-गु जिल्हाचे मा. महापौर यांनी कोरीया भाषेत तर पुणे महानगरपालिकेचे मा. महापौर यांनी इंगजी भाषेत भाषण केले. त्यानंतर दोन्ही मा. महापौर यंाची उपस्थीत मा. लोक प्रतिनिधी आणि मा. अधिकारी यांचे बरोबर सह्या करण्यात आलेला करारनामा दिसेल असे छाया चित्र काढण्यात आली.
सदर करारनामा पुर्ण झाल्यावर सुसॉग-गु जिल्हाचे कर्नल उन्नी नायार या भारतीय जवान जे कोरिया युध्दात यु.एन. डेलिगेशनचे सदस्य म्हणुन सहभागी होते. त्यांचे स्मारकास भेट दिली, सुसॉंग-गु एन.यु., डेगु शहरात उभारण्यात आले आहे. सदर स्मारक प्रेक्षणीय स्थळ असुन सुसॉंग-गु एन.यु. जिल्हातील नागरीक तेथे मॅार्निंग वॅाक व इव्हनिंग वॅाकसाठी जातात. या स्मारकमुळे कोरीया व भारत देशाचा जवळीकता दिसुन येते.
कर्नल उन्नी नापार हे भारताचा प्रतिनिधी म्हणुन एन.यु. कोरीया कमिटी मध्ये होते. त्यांना जुन 1950 मध्ये कोरीया येथे पाठविण्यात आले होते. कोरीया मध्ये पहाणी करीत असताना 12 ऑगस्ट 1950 रोजी बॅाम्ब स्फोटा मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. युध्द चालु असल्याने त्यांचा मृतदेह भारतात पाठविणे अशक्य असल्याने 13 ऑगस्ट 1950 रोजी हिंदु- धर्मानुसार अग्नी देवुन त्यांचा अंत्यविधी ज्युर्क- गोल, सुसॉंग-गु एन.यु. शहरात झाला. आणि 7 डिसेंबररोजी मा. गव्हर्नर यांनी सदर स्मारक कर्नल उन्नी नायार यांचा स्मरणात बांधले.
1967 साली श्रीमती विमला नायार कर्नल नायारची पत्नी यांनी कोरीया येथे पहिल्यांदा स्मारकास भेट दिली त्यानंतर दर वर्षी त्या भारताच्या प्रतिनिधीबरोबर भेट देत राहिल्या. सुसॉंग-गु जिल्हाने सदर परिसराचा विकास 1991 साली केला आणि प्रेेक्षणीय स्थळात त्याचा समावेश केला. शिवाय केंद्र सरकाराने सुध्दा या स्थानकास राष्ट्रीय स्मारकाची सर्व सवलत देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार सदर स्मारकाचा विकास करण्यात आला.
कर्नल नायार यांच्या स्मारक भेटी नंतर दु. 12:00 वाजता मा. उप महापौर श्री. सीन ग्यॅान्ग सिभेप यांच्या बरोबर एका हॅाटेल मध्ये जेवण घेण्यात आले. त्यांनी त्यांचे स्व: खर्चाने सदर जेवण दिले असुन सुसौंगु जिल्हाचे पैसे वापरले नाही हे विशेष आहे.
दुपारच्या जेवणानंतर बुध्द मंदिरात नेले, हे मंदिर प्राचिन असुन या मंदिरात प्रवेश करताना चार दिशेत उभा केलेल्या चार द्वार पालकांना वाकुन हात जोडुन नमस्कार करण्यात येतो. सदर परिसरात बुध्दाची मुर्ती असुन त्या हॅाल मध्ये शांती मंत्राचा जप भेट देणारे भक्तगण करीत असतात. सदर परिसर स्वच्छ असुन शांत वातावरण आहे.
सदर मंदिर भेटी नंतर केबल कार राईट घेण्यात आले. केबल राईड नंतर सुसँाग-गु जिल्हयाचे मा. महापौर यांनी रात्रीचे जेवण दिले. जेवणानंतर सुसौंगु जिल्हयातील नदीपात्रात बांधलेले लाईटिंंग वॉटर फाउंटन व लेजर शो स्वतः मा. महापौर यांनी आम्हा सर्वाना दाखविला, रात्रीच्या वेळी लेजर पाहण्यास आनंद आला, या ठिकाणी नदीच्या कडेला मॉर्निंग व इव्हिनींग वॉक साठी उत्कृष्ट ट्रॅक तयार केला आहे आणि लेजर शो पाहण्यासाठी आलेल्या नागरिकंाच्या बसण्याची सोय केली आहे, या लेजर शो संदर्भांत माहिती स्वत:, मा. महापौर यांनी दिली असून, सदर शो साठी अंदाजे र.रु 400 कोटी इतका खर्च आल्याचे सांगीतले, हा खर्च सुसॉग-गु जिल्हयाने केलेला नसून, एका बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांचे बांधकाम प्लॅन पास करताना लागणारा डेव्हलपमेंट चार्चेस न भरता, लेजर शो व वॉटर फाउंटन चे काम केले आहे, पंरतु सदर लेजर शो आणि लाईटिंग वॉटर फाउंटनचे दुरस्ती व देखभाल मात्र सध्या सुसौंगु जिल्हयामार्फत करण्यात येत आहे.
लेजर शो नंतर रात्री पुन्हा सुसॉग-गु हॉटेल मध्ये आम्ही सर्वांनी मुक्काम केला, गुरुवार दि. 13.6.2013 रोजी सकाळी 10-00 वाजता डेगु आर्ट म्युजियमला भेट देण्यासाठी आम्ही निघालो, सदर आर्ट म्युजियम चे बांधकाम 3 मजली असून, संपूर्ण इमारत एअरकंडिशन्ड आहे. या म्युजियम मध्ये वेगवेगळया मजल्यावर कल्पकतेने तयार केलेले संग्रहालय आहे. उदा. एका हॉल मध्ये निसर्गाचे देखावे तर एका हॉल मध्येचित्रकाराने काढलेले पेंटीग्ज, तर एका हॉलमध्ये घरात उपयोगात येणार्या व सतत वापरात येणा-या वस्तुंचा वापर करुन तयार केलेले उत्कृष्ट देखावे लावण्यात आलेला आहे.
बांधकामामध्ये मीरर फिनीशिंग गग्रॅनाईटचा वापर जास्त केला आहे, स्वछता उत्कृष्ट असून, कोठेही साधा कागद पडल्याचे दिसून आले नाही. तसेच तेथील नागरिकाना गुटखा अथवा पान खाण्याची सवय नसल्याने कोठेही थुंकीही दिसून येत नाही. सदर बांधकाम डेगु या शहराने केले असून, याची संपूर्ण दुरुस्ती व देखभाल डेगु शहराकडे आहे वास्तविक डेगु शहरात सुसॉंग-गु जिल्हा असून, सदर वास्तुची संपूर्ण जबाबदारी डेगु शहराची आहे.
डेगु आर्ट म्युजियम नंतर आम्ही गोसान वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्पास भेट दिली, सुसॉंग-गु जिल्हयात दोन वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्प आहेत, त्यातल्या एका प्रकल्पास आम्ही भेट दिली, सुसाँग जिल्हयासाठी पाणी, धरणातून 2500 मी.मी. बंद पाईप लाईन मधून आणले जाते, या धरणाचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाते असे त्यांनी सांगीतले. या धरणातून पाणी पंपीग करुन वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्पात आणले जाते, याच पाण्याच्या प्रवाहात मिनी हायड्रो पॉवर प्रकल्पाचा वापर करुन वीज निर्मिती करण्यात आली आहे. या वीज प्रकल्पाची क्षमता 560 के.डब्ल्यु. असून प्रत्यक्षात वीज निर्मिती 165 के.डब्ल्यु. इतकी होते. धरणातून पाणी वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्पात घेताना इंटटेक जवळ या वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे, या प्युरिफिकेशन प्रकल्पात येणारे पाणी मुळात स्वच्छ असून, येणा-या पाण्याचे सुरुवातीला पीएच व्याल्यु (तरर्श्रीश) काढली जाते, यावर पीएसी चे प्रमाण त्यांना कळून येते, आपल्याप्रमाणेच ते सुध्दा प्री- क्लोरिनेशन चा प्रकिया करतात, प्री-क्लोरिनेशन करताना स्टर्लिंग आणि त्यानंतर सेटलिंग केले जाते, त्यानंतर फिल्टर बेड मध्ये पाणी घेऊन बेडच्या खालुन स्वच्छ पाणी स्टोअरेज टँक मध्ये नेले जाते या फिल्टर बेड मध्ये चिल्ड वॉटर स्प्रिकंलरने संपूर्ण वातावरण थंड ठेवण्यात आले आहे.स्टोअरिंग टँक मध्ये पोस्ट क्लोरिनेशन केले जाते, सर्वात महत्वाचे म्हणजे स्टोअरेज टँक वर संपूर्ण लॉन तयार करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार दिसतो, आपल्या कडील क्लीन वॉटर स्टोअरेज टँक वरील स्लॅबला क्लोरिनमुळे सतत चिरा पडतात तसे या ठिकाणी दिसून आले नाही. या वॅाटर ट्रिटमेंन्ट प्लांट मध्ये शुध्द केलेले पाणी ल्पास्टीक बॅाटल मध्ये भरुन लोकांना विकण्यासाठी छोटासा प्लॅांट सुसॉंग-गु महानगरपालिकेने उभारला आहे. या ठिकाणी संपुर्ण प्रोसेस म्हणजे स्वयंचलीत म्हणजे बाटली स्वच्छ करणे, त्यात पाणी भरणे, त्याच्यावर बुच लावणे, त्यावर प्लास्टीक नेमप्लेट लावणे व पॅकिंग करणे इ. संपुर्ण प्रोसेस मशीनरीने केली जाते. वॉटर प्युरिफिकेशन नंतर आम्हाला मा. श्नि चुलबुम, सुसॉग-गु नॅशनल युनिफिकेशन कॉन्सोलेट चे शाखा प्रमुख यांनी त्यांच्या स्वःखर्चाने दुपारी 12.00 वाजता जेंवण दिले हे जेवन भारतीय पध्दतीचे असुन, हॅाटेलचे मालक भारतीय आहेत. हॉटेलमध्ये हिंदी गाणी लावली जातात.
दुपारच्या जेवणानंतर आम्ही सुसॉंग-गु जिल्हयातील नेब्युन गीन मिडल स्कुल पाहण्यास गेलो. बिशप यांच्या संमतीने/सहकार्याने सदर शाळा चालविले जाते, या शाळेत या पूर्वी भारतीय म्हणजे पुण्यातील विदयार्थी शिकण्यासाठी आले होते व या शाळेतील विदयार्थी पुण्यातील बिशप शाळेत गेले होते, यासाठी गेल्यावर्षी पुण्यातील बिशप शाळे बरोबर त्यांचा करार झाला होता. या शाळेत प्रवेश करतानाचा व काही लोकही पुण्यात येऊन गेल्याचे कळाले. सर्व मुलांनी आमचे नमस्ते म्हणून स्वागत केले, नमस्ते म्हणण्याचा सराव नियमित शिक्षण त्यांचेकडून करुन घेत असल्याचे आम्हा सगळयंाचे लक्षात आले. या शाळेत मुलंाच्या सायकल पार्किंगसाठी खास जागा आरक्षित केलेली आहे. बहुतेक या शाळेतील जास्तीत जास्त मुले/ मुली सायकल वापरत असल्याचे दिसते. या शाळेत खेळासाठी मैदान असून, सर्व प्रकारचे खेळ खेळवले जातात यात फुटबॉल खेळताना जास्त मुले दिसून आले.
या नंतर कोरीयन संस्कृती जपणार्या कोरीयातील जेष्ट नागरिकांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो. या ठिकाणी त्यांचा संस्कृती टिकविण्यासाठी स्वयंसेवी संघटणा निशुल्क काम करीत असल्याने आम्हा सर्वांच्या लक्षात आले. तेथे कोरीयन संस्कृतीतील स्त्रियांचे ड्रेस (आम्बो) व पुरुषांचे पारंपारिक ड्रेसचे जतन केले आहेे.
येथे येणार्या सर्व लोकांनाते स्वत: आदाराने त्यांच्याकडील पारंपारिक पोशाख परिधान करण्यास विनंती करतात आणि त्यांचा पोशाख परिधान करुन एका विशिष्ट पध्दतीत बसणे, चहा तयार करणे आणि कशा प्रकारे चहा पिणेे याचे शिक्षण देतात. या ठिकाणी शांत वातावरण असुन मन एकाग राहण्यास मदत मिळते. मनास शांती मिळण्यासाठी हे ठिकाण प्रसिध्द असल्याचे कळते. चहा पाना नंतर त्यांनी पुन्हा एकदा आम्हा सर्वांचे आभार मानले आणी पुण्याचे महापौर यांनी सुध्दा त्यांचे आभार मानले.
सदर आभार कार्याकमानंतर आम्ही सायंकाळी 7:00 वा रात्री च्या जेवण्यासाठी हॅाटेल मध्ये गेलो तेथे त्यांचे चेअरमन, सुसॉंग-गु यांनी आम्हा सर्वांचे स्वागत केले आणी रात्रीचे जेवण त्यांचा स्व:खर्चाने आम्हा सर्वांना दिले व आम्ही सुध्दा आनंदाने जेवण जेवलो. रात्रीचा जेवणानंतर आम्ही पुन्हा सुसॉंग-गु हॅाटेल मध्ये रात्रीचा मुक्काम केला.
शुक्रवार दि. 14/6/2013 रोजी सकाळच्या न्याहारी नंतर आम्ही सर्व सुसँाग-गु शहरातील आर्ट गॅलरी पहाण्यासाठी गेलो. तेथे विविध कलाकरांचे चित्र प्रदर्शन असुन उत्कृष्ठ कला कौशाल्याचे प्रदर्शन तेथे मांडण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही डेगु नॅशनल फुटबॅाल स्टेडियम पहाण्यास गेलो. या स्टेडियम मध्ये सभागृह असुन तेथे विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या ठिकाणी विविध राष्ट्रांचे फ्लॅग प्रदर्शनार्थ ठेवले असुन छायाचित्रावर विविध देशांच्या खेळाचे प्रतिनिधीत्व करणार्या पदाधिकारी यांचे फोटो त्यात्या देशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनात मा. कलमाडी, मा. खासदार पुणे यांचे छायाचित्र त्या विदेशी अधिकारी बरोबर पाहुन आम्हा सर्वांना आनंद वाटला या ठिकाणी विविध राष्ट्रीय खेळाडु यांचा सह्या केलेला फुटबॅाल प्रदर्शतात ठेवण्यात आला आहे. शिवाय विविध छायाचित्राचे प्रदर्शन या हॅाल मध्ये मांडण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही मैदानावर गेलो तेथे संपुर्ण परिसर सी.सी.टी.व्ही. कॅमेराच्या सहाय्याने कव्हर केला असुन उत्कृष्ठ चित्रीकरण केले जाते. या ठिकाणी व्ही.आय.पी. लोकांना बसण्याची वेगळी सोय केली असुन मा. गव्हर्नर यांची विशेष व्यवस्था केली आहे. या स्टेडियम मध्ये डिपार्टमेंटल स्टोअर असुन तेथे विविध खेळांचे साहित्य मिळतात. तेथे रेस्टॅारंट सुध्दा आहे, त्यामुळे या सुसज्ज स्टेडियमची पहाणी नंतर आम्ही पुण्यासाठी रवाना झालो. अशा प्रकारे कोरीयाचा प्रवास आम्ही केला या देशाबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
दशिण कोरीयातील डेगु या मेट्रो सिटी मध्ये एकुण 8 लहान लहान जिल्हे आहे. या पैकी एक जिल्हा म्हणजे सुसॉं-गु या जिल्हाचे महापौर लोकशाही पध्दतीने निवडुन दिले जातात. शहराची लोक संया 4 ते 4.5 लक्ष असुन या शहराचे क्षेत्रफळ 250 चौ मि आहे. यात महिला व पुरुषांची संया बरोबरीची असुन महिलांची संया थोडी जास्तच आहे. येथे विदेशी लोक अंदाजे 1500 आहेत. या महापालिकेत 20 नगसेवक असुन एकुण बजेट 3 लाख मिलयन वॅान इतके आहे. यांचे कॅान्सील मध्ये 1 चेरमन व 1 डेप्युटी चेरमन व 5 कमिटी मेंबर आहेत.
सुसॉंग-गु या शहरातील विविध विभागांचे उेखनीय कार्याबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
रस्ते:- या शहरातील सर्व रस्ते सरळ व एका रेषेत आहेत. सर्व रस्त्यांवर पांढरा व पिवळा पट्टा मारलेला दिसुन आले. याठिकाणी फुटपाथ असुन फुटपाथ वर सायकल ट्रॅक तयार केलेला आहे. शहरातील सर्व फुटपाथ वरील सायकल ट्रॅकवर हिरवा रंगाचा प्लास्टीक पेंट मारलेला दिसुन आला. सदर ट्रॅक स्मुथ नाही या सायकल ट्रॅक वरुन टु- व्हीलर सुध्दा चालवित असल्याचे दिसुन आले असुन मुय रस्त्यावर एक ही टु- व्हीलर चालविताना दिसली नाही. या शहरात टु- व्हीलरची संया खुप कमी असुन फोर- व्हीलर जास्ती- जास्त असल्याचे दिसुन आले. या शहरात उजव्या बाजुन वाहने चालविले जातात. सर्व ट्रॅक डंाबरी असुन फुटपाथ मात्र इंटरलॅाकींग ब्लॅाक ते तयार केलेला आहे. या शहरातील सर्व कर्व स्टोन म्हणजे फुटपाथ व मुय रस्ता या मध्ये बांधण्यात येणारा कठडा हे मीरर फिनीशींग ग्रॅनाईटसचा वापर करुन तयार केलेला आहे. ट्रॅक ची रुंदी 1 ते 1.5 मीटर असुन इंटरलॅाक ब्लॅाक असलेला फुटपाथची रुंदी जवळ-जवळ 1.5 ते 2 मीटर आहे. या फुटपाथवर झाड असुन एकाही झाडांमुळे फुटपाथवरुन चालणार्या नागरीकांना त्रास होत नाही कारण या फुटपाथवरील सर्व झाडे सरळ वाढलेली असुन काही झाडांना सरळ वाढण्यासाठी तीन बांबुचा सहारा देण्यात आल्याचे दिसते यामुळे बर्याच झाडांना बांबु बांधलेले दिसुन आले झाडांना मार्किंग केलेले आहे. शिवाय स्ट्रीट लाईटचे पोलांना सुध्दा मार्किंग केलेले आहे.
या शहरातील वीज वाहिन्या उपरी असुन एच.टी. व एल.टी लाईन सर्व उपरी आहेत. विविध ठिकाणी सिंगल फेझ तीन ट्रान्सफॅार्मर पोलवर उभारली असुन या ट्रान्सफॅार्मर मधुन तेथील घरांना व दुकानांना वीज देण्यात आले आहे.
या शहरात इंटरनेट केबल व टेलिफोन केबल सुध्दा स्ट्रीट लाईट पोल वरुन उपरी नेलेले आहे. सर्व उपरी असुन या शहरात भुमिगत केबलचे कामे केलेले दिसुन आलेला नाही. अशा प्रकारचे उपरी केबल (वीज केबल व टेलिफोन केबल) मुय रस्त्यावर आणी लहान- लहाणरस्त्यावरील पोलवर दिसुन आल्या केबलचे जाळे शहरात ठिक- ठिकाणी दिसुन येतो.
या शहरात सिगनल चालण्यासाठी व वाहनांसाठी असुन एकाही चौकात ट्रॅफिक पोलीस दिसुन आला नाही. या बाबत विचारणा केली असता या शहरातील सर्व रस्ते सी.सी.टी.व्हीने कव्हर केले असुन ट्रॅफिक पोलीस यांच्या पगारा ऐवजी सी.सी.टी.व्ही. वर खर्च केल्याचे दिसुन येते. मॅन पावर नसल्याने कोणत्याही वाहनास अडविण्याचे प्रकार दिसुन आले नाही. कोणतेही वाहन सिगनल तोडुन जात नाही. त्यामुळे एक प्रकारची वाहतुक शिस्त येथे दिसुन आली. या शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम आहे. कारण बस सेवा आहे तसेच प्रायव्हेट टॅक्सी आणी मोनो-रेल आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीचा समस्या तेथे दिसुन येत नाही.
या शहरातील रस्ते स्वच्छ असुन कोठेही धुळ दिसुन येत नाही. या शहरातील रस्त्यांचे स्वीपींग सकाळी 10:00 च्या अगोदर होत असावे कारण आम्हाला स्वीपींग करताना कोठेही दिसुन आले नाही. या शहरातील बहुतेक लोक सकाळी 6:00 च्या आत उठतात व सकाळी 7:30 च्या आत न्याहरी करतात व दुपारचे जेवण 12:00 ते 1:00 या वेळेत आणी रात्रीचे जेवण सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत करतात असे समजले.
तरी वरील सर्व माहिती मला मिळालेल्या प्रत्यक्ष अनुभवातील असुन दक्षिण कोरीया प्रवासाचा अहवाल आपल्या अवलोकनार्थ सादर करीत आहे.