शिंदे फडणवीस सरकारने अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविध विषयांशी संबधित २६४ इतक्या समित्या अवघ्या १ वर्षाच्या काळात स्थापन केल्या आहेत. अर्थात यामध्ये पुनर्गठीत, पुनर्रचित किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्या यांचा समावेश नाही.त्यांचा समावेश केला तर तो आकडा ५२१ इतका होतो. एखाद्या विषयाला बगल द्यायची असेल, तो विषय टाळायचा असेल, किंवा इतर काही त्यामागे हेतू असेल तर त्या विषयावर समिती स्थापन करण्याचा हातखंडा शासन प्रशासनामध्ये वापरला जातो.
महाराष्ट्र
राज्याची स्थापना झाल्या नंतर सुरुवातीच्या काळात समित्या स्थापन करण्याचा प्रकार
नगण्य असा होता. महाराष्ट्रातील
पहिली समिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची १९६२
मध्ये स्थापन झाली. त्यानंतर दुसरी
समिती १९६३ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर १९६४ ते १९७० या
काळात अवघ्या 3 समित्या स्थापन करण्यात
आल्या.परंतु नंतर लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढलं आणि
त्याबरोबरच समित्या स्थापनेचे प्रमाणही तेवढेच वाढले.
समित्या
स्थापल्याने त्या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्यांना बरं वाटतं. आपला विषय मार्गी लागला असं वाटतं. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही. नंतर
समित्यांची पुनर्रचना, पुनर्गठण, मुदतवाढ असे प्रकार केले जातात. मुळात शासनात
अपवाद वगळता समित्यांची गरज पडत नाही. प्रत्येक विषयासाठी समिती स्थापन करायची तर
मग अधिकारी,लोकप्रतिनिधींनी
आणि मंत्र्यांनी करायचं काय?.
महाराष्ट्र
राज्याच्या स्थापनेनंतर मंत्रालयात समित्या स्थापन करण्याचे प्रमाण किती आणि कसे
वाढले ते पहा.
१९६४ ते १९७० या
७ वर्षांच्या काळात अवघ्या ३ समित्यांची स्थापना करण्यात आली.त्यानंतर १ जानेवारी १९७१ ते ३१
डिसेंबर १९७५ या ५ वर्षात कालावधीमध्ये
अवघ्या ४ समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा पुनर्गठन
करण्यात आले, १ जानेवारी १९७६ ते ३१
डिसेंबर १९८० या कालावधीमध्ये ८ , १ जानेवारी १९८१ ते ३१
डिसेंबर ८५ या
कालावधीत १८ समित्या, १ जानेवारी १९८६ ते ३१ डिसेंबर १९९० या
कालावधीमध्ये २३ समित्या , १ जानेवारी १९९१ ते ३१ डिसेंबर १९९५ या
कालावधीमध्ये ३९ समित्यांचे गठन, पुनर्रचना किंवा
पुनर्गठन करण्यात आले
त्यानंतर १ जानेवारी १९९६ ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीमध्ये १२४ समित्या, १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीमध्ये २८० समित्या, १ जानेवारी २००६ ते १ डिसेंबर २०१० या कालावधीमध्ये ८२८ समित्या. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये १२४३, १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेम्बर २०२० या कालावधीत ३०१६ व १ जानेवारी २०२१ ते २९ जून २०२३ पर्यंत राज्य शासनाने १३२५ एवढ्या समित्या स्थापन केल्या किंवा त्यांची पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आले किंवा त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करण्यात आली. यातील जवळपास दोन वर्षांचा कालावधी हा कोविड कालावधी होता. शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात एकूण २६४ समित्या स्थापन केल्या. यामध्ये पुनर्रचना- पुनर्गठन करण्यात आलेल्या किंवा मुदतवाढ दिलेल्या समित्यांचा समावेश नाही.
शिंदे फडणवीस सरकारने मागील एक वर्षात स्थापन केलेल्या समित्या.