v

Monday, February 6, 2017

मत कुणाला द्यावे ?

मत कुणाला द्यावे?  हा प्रश्न प्रत्येक निवडणूकीच्या वेळी मतदारांना पडतो.या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी मतदान करण्यापूर्वी ते का करतोय याचा विचार केला पाहिजे. सध्या महापालिकांच्या निवडणुका सुरू आहेत.या निवडणुकीत मतदान करताना आपण इतर बाबींपेक्षा आपल्या मताचा आदर करण्याची ग्वाही जो उमेदवार देईल त्याला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या मताचा म्हणजे मतदारांच्या मतांचा आदर आणि मताचा आदर म्हणजे निवडून आल्यानंतर मालकसारखे न वागता काहीही करताना नागरिकांच्या मतांचा आदर केला पाहिजे,  नागरिकांची मते विचारात घेतली पाहिजेत. तसा कायदाही आहे.


Image cortsey yogeshdevaraj.wordpress.com
शहराचे धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांचा थेट सहभाग असावा ह्यासाठी क्षेत्रसभेचा कायदा व क्षेत्रसभेची रचना करण्यात आली आहे. क्षेत्रसभा ज्या महापालिकेच्या प्रभागातील असते त्या प्रभागाचा नगरसेवक क्षेत्रसभेचा अध्यक्ष असतो. क्षेत्रसभा भरवणे ही जबाबदारी त्याची असते. दोन वर्षात किमान चार क्षेत्रसभा घेतल्या नाहीत तर संबधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द होउ शकते.तसेच असे नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार त्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना राज्य सरकारने दिलेले आहेत.
Image courtsey economist.com

क्षेत्र सभा हे प्रभाग आणि शहर पातळीवरील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचे आणि धोरणात्मक किंवा विशिष्ट गोष्टीशी संबंधित निर्णय घेण्याचे व्यासपीठ असते. क्षेत्रसभेमध्ये धोरणात्मक आणि निर्णय घेण्याबाबत ठराव मांडायचे असतात. क्षेत्रसभा सदस्य शासकीय यंत्रणेला जाब विचारू शकतात . आपलं शहर, आपला परिसर कसा असावा हे  क्षेत्रसभेच्या माध्यमातून त्या भागातील नागरिकांनीच ठरवणे या कायद्याला अपेक्षीत आहे. जेणेकरून लोकशाहीत लोकांचा थेट सहभाग वाढेल.त्यामूळे क्षेत्र सभा घेण्याची ग्वाही देणा-या उमेदवाराला नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे.
 Image courstey huffingtonpost.com


 प्रत्येक  निवडणूकीपूर्वी मतदाराने आपण सेवक निवडतोय की स्वत:साठी मालक निवडतोय याचा विचार केला पाहिजे.आपल्या मताचा आदर करून स्वच्छ मनाने आणि निर्भिडपणे मतदान केले तर आपण निवडून दिलेल्या सेवकाला मालक या नात्याने जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला राहील आणि लाचार होउन लोभापोटी मतदान केले तर आपण स्वत:साठी मालक निवडतोय असा त्याचा अर्थ होईल.कोणत्याही लालसेपोटी मतदान करणारे लोक हे गुलामीपसंत असतात आणि मत विकून ते स्वत:साठी मालक निवडून स्वत:होउन गुलामगीरी स्विकारतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आणि गुलामांना कोणतेही हक्क नसतात.
image courtsey trak.in

प्रत्येक मतदाराने नेहमी आपणास आपल्या मताची किंमत समजली आहे का आणि आपणतरी आपल्या मताचा आदर करतो हे पहाणे आवश्यक आहे. लोकशाही म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर लहानपासून ‘लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही‘ असे जवळजवळ प्रत्येकाने तोंडपाठ केलेले असते. परंतु लोक म्हणजे आपण आणि आपण या देशाचे राजे आहोत असे आपल्याला कधी वाटते का? आपल्या वतीने हा देश चालविण्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून सेवक निवडण्यासाठी आपण मतदान करत असतो याचा विचार आपण करतो का? हा विचार न केल्यानेच लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले की जनतेच्या मताला किंमत देत नाहीत आणि तो स्वत:च मतदारांचा मालक असल्यासारखा वागतो. आपला देश स्वतंत्र झाल्यापासून वर्षानुवर्षे हेच घडत आले आहे.
Image courstey huffingtonpost.com

महापालिकांच्या निवडणूकीमध्ये नागरिकांनी नगरसेवकांकडून काय अपेक्षा कराव्यात याची प्रभाग परत्वे वेगळी यादी होउ शकेल . अर्थात ‘अपेक्षा कराव्या‘ हा शब्द योग्य नाही कारण नागरिकांनी ही कामे क्षेत्र सभेच्या माध्यमातून भावी ‘सेवकां‘ कडून करून घ्यायची आहेत. सार्वजनिक मुद्यांमध्ये प्रभागातील नागरिकांना दरमहा केलेल्या कामांचा तपशील देईन. शहर विद्रुप दिसू नये यासाठी स्वत: बेकायदा होर्डींग्ज लावणार नाही. अस्तित्वातील परंतु नागरिकांची हवा आणि प्रकाश यांना अडथळा यांना अडथळा  आणणारी होर्डींग्ज काढून टाकेन.वार्डातील नैसर्गीक नाले ओढे बुजवणार नाही.अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठीशी घालणार नाही. मुलांसाठी खेळाची मैदाने उपलब्ध करून देईन.आरक्षणे बदलणार नाही. सार्वजनिक वाहतून व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करेन यांची हमी नागरिकांनी उमेदवारांकडून घ्यावी.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Email – kvijay14@gmail.com
Website – http://surajya.org/

No comments:

Post a Comment