सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

पुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकसले ?


सोबतच्या तक्त्यामध्ये 2009 चा विद्यमान विकास आराखडा , 2011 साली नगर रचना अधिका-यांनी  सर्वसाधारण सभेसमोर सादर केलेला आराखडा आणि सर्वसाधारण सभेने मंजूर केल्यानंतर नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी सादर करण्यात आलेला आराखडा यातील तुलनात्मक फरक  दिला आहे.
यातील काही मुद्दे सहजासहजी लक्षात येत नाहीत , उदाहरणार्थ विद्यमान वापर आराखड्यात झोपडपट्टी  444.08 हेक्टर इतक्या क्षेत्रावर असल्याचे  दिसून येते . परंतु नगर रचना अधिकार्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात झोपडपट्टी हा मुद्दाच नाही.  त्याऐवजी इडब्ल्यूएस / स्लम इंप्रुव्हमेन्ट असा वापर दिसतो त्यामूळे ते दोन्ही मुद्दे एकच असावेत असे इथे गृहित धरण्यात आले आहे , ट्रान्स्पोर्टेशन या मु्द्याऐवजी ट्रॅव्हल अँड ट्रान्स्पोर्टेशन असा शब्द वापरल्याचे दिसते.तर विद्यमान विकास आराखड्यात फ़ौरेस्ट  हा मुद्दाच नाही मात्र नगर रचना अधिका-यांनी  ठेवलेल्या प्रस्तावात 304 हेक्टर फ़ोरेस्ट  असल्याचे म्हटले आहे.
इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यमान जमिन वापरअहवालातील शहराचे एकूण क्षेत्र 14758.35 हेक्टर्स इतके आहे. 1987 च्या विकास आराखड्यात हे क्षेत्र 13885 हेक्टर्स इतके होते.

* एक चौ .कि.मी म्हणजे शंभर चौ.हेक्ट्रर ,एक हेक्टर म्हणजे एक लाख चौ.फूट .
* 1987 साली एकूण वॉटरबॉडिच्या 1204 हे . क्षेत्रापैकी केवळ 250 हे.क्षेत्र विचारात घेतले होते .1204 हेक्टर्स क्षेत्राचा  उ‘ल्ले ख पुणे महापालिकेच्या अनेक रिपोर्ट्स मध्ये आढळतो.याचाच अर्थ 1987 च्या तुलनेत हे क्षेत्र 507.93 हेक्टर्सनी आक‘सले आहे .त्यातील 2009 चा जमिन वापर विचारात घेतला तर 1987 ते 2009 या कालावधित 263.92 हेक्टर तर 2009-10  ते 2011 या कालावधित 241.5 हेक्टर इतके क्षेत्र आक‘सले .तर माननीयांच्या उपसूचनांमूळे ते आणखी 2.59 हेक्टर्सनी कमी झाले.याचाच अर्थ वॉटर बॉडिजचे क्षेत्र 1987 ते 2009 या कालावधित दोन कोटी त्रेसष्ट लाख ब्यान्नव हजार चौरस फुटांनी  कमी झाले तर , 2009 ते 2011 या कालावधित दोन कोटी एक्केचाळीस लाख पन्नास हजार चौरस  फुटांनी  कमी झाले.

* डोंगर उताराचे क्षेत्र 2009 -10 या वर्षात 1236.37 हेक्टर इतके म्हणजे  बारा कोटी छत्तीस लाख बहात्तर हजार चौ फुट होते ते 2011 साली  854,74 हेक्टर म्हणजे 381.98 हेक्टरनी कमी झाले . म्हणजे तीन कोटी एक्क्याऐंशी लाख अटठ्यान्नव हजार चौरस फुटांनी   कमी झाले .माननीयांनी उपसूचना देउन ते आणखी 11.92 हेक्टर म्हणजे 11 लाख 92 हजार फुटांनी   आणखी कमी केले .
*रहिवाशी क्षेत्रात माननीयांच्या उपसूचनेमूळे 27.47 हेक्टर म्हणजे 27 लाख 37 हजार चौ.फूट  इतकी वाढ झाल्याचे दिसून येते.
* प्रारुप विकास आराखड्यात टींबर मार्केट साठी 7.40 हेक्टर इतके क्षेत्र राखीव ठेवण्यात आले होते मानीयांनी त्यात उपसूचना देउन ते 12.40 हेक्टर इतके केले . म्हणजे तब्बल पाच लाख तीन हजार चौ .फूट  इतके क्षेत्र वाढविण्यात आले .
* झोपडपट्टीच्या क्षेत्रात माननीयांच्या उपसूचनेमूळे 4 लाख चार हजार चौ फूट इतकी  वाढ झाल्याचे दिसते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा