सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

पोस्ट ट्रुथ म्हणजे “सत्य पश्चात” नेमके आहे तरी काय ?

माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांचे संपादकीय लेख टाईम्स ऑफ़ इंडिया ग्रुपचे एक नियतकालिक ‘यंग भास्कर‘ मध्ये छापले गेले आहे. सध्याच्या काळात  उत्पादने विकण्यासाठी किंवा निवडणूका जिंकण्यासाठी ‘ पोस्ट ट्रुथ’चा वापर केला जात आहे. परंतु हे ‘पोस्ट ट्रुथ‘ प्रकरण आहे.त्याचा आपल्यावर काय परिणाम होउ शकतो? हे आपल्यालाही समजावे म्हणून त्या लेखाचे स्वैर भाषांतर इथे प्रसिद्ध करीत आहे. तसेच ‘पोस्ट ट्रुथ‘ला ‘सत्य-पश्चात‘ असाच शब्द झगडे यांनी सुचवला आहे.                       


Image courtsey startupsventurecapital.com








मित्रांनो, हे जगाचे एक सौंदर्य आहे की ते सतत बदलते असते. हा बदलच आपल्या जीवनात सुधारणा घडवत असतो. आपल्याला माहिती आहेच की अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरील बदलांमुळे जैविक स्वरुपाच्या निरंतर उत्क्रांतीची प्रक्रिया झाली.मानवाची उत्क्रांती ही या बदलांचा एक उत्कृष्ट परिणाम आहे.परंतु, आपल्या दैनंदिन जीवनातील  असे काही बदल आपल्यासाठी हानिकारक आहेत की नाही याविषयी आपण जागरूक असले पाहिजे. काही हानिकारक बदल आपल्या आजूबाजूला घडू शकतात. परंतु , आपल्या अज्ञानामुळेच आपण त्याला बळी पडू शकतो.उदाहरणार्थ, आज मी अशा एका हानिकारक बदलाची ओळख करून देत आहे .ज्याचा विपरित परिणाम आपल्यावर व्यक्तीगत जीवनावर आणि मानवतेवर होऊ शकतो.

आपल्याला माहिती आहेच की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे.लोक आणि समुदायांमधील परस्पर संवादाने एक समाज निर्माण होतो. हा समाज  स्वभावाने खूप मजबूत असतो, परंतु त्याला नकारात्मक मानसिकता असलेल्या शक्तींच्या प्रभावामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशी एक नकारात्मक बाजू समाज व्यवस्थेतील एक प्रमुख घटक म्हणून उदयास येत आहे. त्याला ‘सत्य-पश्चात‘ म्हणतात
.
ऑक्सफोर्ड शब्दकोशाने वर्ष २०१६ मध्ये ‘सत्य-पश्चात‘ या शब्दाला वर्षाचा आंतरराष्ट्रीय शब्द घोषित केला. आता, या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याला वर्षाचा आंतरराष्ट्रीय शब्द म्हणून का निवडले गेले? आणि  महत्त्वाचे म्हणजे ‘सत्य-पश्चात‘ चा आपल्यावर कसा प्रभाव पडू शकतो ते पाहूया.

 ‘सत्य-पश्चात‘  चा साधा अर्थ "सामान्य माणसाला आपले मत बनवण्यासाठी परिस्थितीशी किंवा  व्यवस्थेशी संबंधित अशा बाबी दर्शवणे ज्यामध्ये वस्तुनिष्ठ तथ्याला भावना आणि वैयक्तिक श्रद्धेपेक्षा कमी महत्व दिले जाते ". एखादी वस्तुस्थिती काय आहे आणि काय नाही किंवा सत्य काय आहे आणि काय नाही याविषयी मानवी मन स्पष्ट असले पाहिजे. आमचे मन आणि त्याची तर्कशुद्ध  प्रक्रिया करणारी यंत्रणा लाखो वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत विकसित झाली आहे आणि सुमारे २,५०,००० मानवी पिढ्यांच्या अनुभवांमुळे तसेच विविध पिढ्यांच्या शहाणपणामुळे ते आणखी मजबूत बनले आहे.सत्य आणि वस्तुस्थितीचे आकलन  ही समस्या असू शकते, परंतु स्वतः सत्य किंवा वस्तुस्थिती बदलली जाऊ शकत नाही. मानवी सहजीवनाची पायाभरणी सत्यावर आधारित आहे आणि त्याच्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहेच, आपल्या लाडक्या बापूंच्या मते, सत्य देव आहे!

परंतु, या बदलत्या जगात दुर्दैवाने सत्यावरही परिणाम होत आहे. ‘सत्य-पश्चात‘  वातावरण जगभरात मूळ धरत आहे सत्य आणि वस्तुस्थिती हद्दपार होत आहे, तसेच वैयक्तित गैरफायद्यासाठी  भावनिकदृष्ट्या भारलेला , तथ्यविसंगत  चुकीचा किंवा दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे.ऑक्सफोर्ड शब्दकोशाने  हा शब्द २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय शब्द म्हणून निवडला कारण अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका आणि ब्रेक्सिट जनमतासाठी ब-याचदा  ‘सत्य-पश्चात‘  रणनीती वापरली गेली.

बातम्या, समाज माध्यमातील माहिती, जाहिराती इत्यादी पाहताना, वाचताना आणि ऐकताना आपल्याला आता अधिक काळजी घ्यावी लागेल कारण ते ‘सत्य-पश्चात‘  असू शकते. सत्य काय आहे आणि ‘पोस्ट ट्रुथ‘ काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपले मन सर्वोत्कृष्ट पंच असते. परंतु एखादी व्यक्ती, कुटूंब, समुदाय, व्यवसाय उद्योग किंवा एखादा देश ‘सत्य-पश्चात‘  ची ओळख पटविण्यात अपयशी ठरला तर अनेक आपत्तींना कारणीभूत ठरू शकते.

‘सत्य-पश्चात‘ वापरून आजकाल उत्पादने विकली जातात किंवा निवडणुका जिंकल्या जातात आणि आपण त्याचा बळी ठरतो.

चला , तर मग आपण बळी ठरता कामा नये.सुज्ञ मनुष्य होउया ‘सत्य-पश्चात‘ चे आक्रमण थांबवूया आणि एक चांगले जीवन जगूया.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                   
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

Website –  http://vijaykumbhar.com _
                  https://vijaykumbhar-hindi.blogspot.com/
                  https://vijaykumbhar.blogspot.com/
                  http://surajya.org/
Email    –  admin@vijaykumbhar.com
                  kvijay14@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा