राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीमधील हजारो कोटी रुपयांचा ऑनलाइन लॉटरी घोटाळा उघडकीस आला आहे. २००१ ते २००९ दरम्यान झालेल्या ऑनलाइन लॉटरी घोटाळ्यामुळे सरकारला दरवर्षी २५ ते ३० हजार कोटींचा फटका बसल्याचे बोलले जाते. दैनिक लोकसत्ताने आज ही बातमी छापली आहे.घोटाळा जरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीमधील असला तरी या घोटाळ्याचा सूत्रधार सँटियागो मार्टिन या सर्वपक्षीय लोकांशी संबध ठेउन होता असे दिसते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मार्टिनचा मुलगा चार्ल्स याने मागील वर्षी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता तर त्याची पत्नी लीना हिने मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी एका निवडणूक सभेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत भाग घेतला होता .
Santiago Martin |
एकेकाळी म्यानमार मध्ये साधा कामगार असलेल्या मार्टिनने भारतात आल्यानंतर मार्टिन लॉटरी एजन्सीज लि ही दोन अंकी लॉटरी चालवणारी कंपनी स्थापन केली . या व्यसायातून मिळणा-या पैशामूले स्वाभाविकपणे त्याला अनेक राजकीय मित्र मिळाले. त्यातूनच कितीही घोटाळे केले तरी त्याच्या केसालाही धक्का लागला नाही.
या घोटाळ्यात सामिल असलेली मे. मार्टिन लॉटरी एजन्सीज लि. यांचा हा पहिलाच घोटाळा आहे अशातील भाग नाही. या घोटाळ्याचा सूत्रधार सँटियागो मार्टिन याचे या पूर्वीही अनेक घोटाळे बाहेर आले आहेत. एकट्या केरळमध्ये मार्तिन विरोधार लॉटरी घोटाळ्याच्या ३२ पेक्षा जास्त केसेस प्रलंबीत आहेत . वेगवेगळ्या राज्यातील बाबूंना आणि राज्यकर्त्यांना हाताशी धरून त्याने हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले आणि पचवले आहेत.
मध्यंतरी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) व ईडीने कोलकाता व सिलिगुडी येथे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडींमध्ये हवाल्याची ८० कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. कोलकात्यात दोन ठिकाणी १६ गोणी, २७ प्रवासी बॅगा आणि २ कपाटांमधून ही रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. हा घोटाळा किमान चार हजार कोटी रुपयांचा असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. जी. सिस्टीम आणि एफपी इंटरप्रायजेस या दोन कंपन्यांच्या परिसरातून धाडीत जप्त करण्यात आलेला पैसा मोजण्यासाठी १०० लोकांचा चमू रोख मोजणाऱ्या मशिनसह काम करीत होता. एस. नागार्जुन आणि सँटियागो मार्टिन हे दोघे या हवालाकांडाचे मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जाते.
मार्टिन तीन वर्षांपूर्वी चेन्नईत सक्तवसुली संचालनालयासमक्ष उपस्थित झाला होता. त्यावेळी त्याच्याजवळून सात कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते.या कंपन्या बनावट लॉटरी रॅकेटमध्ये सामील होत्या, असा संशय आहे. गैरव्यवहारातून जमा करण्यात आलेला पैसा प्रथम हवालामार्फत दुबईला पाठविण्यात येत होता. तेथून तो पाकिस्तानला जात होता. असेही बोलले जाते.
Subscribe for Free
To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.
RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा