प्रती ,
1)मा.श्री.
विकास देशमुख
मा.जिल्हाधिकारी .
पुणे
,
2)मा.श्री.
महेश पाठक
आयुक्त
, पुणे महानगरपालिका
पुणे
विषय - कात्रज दुर्घटनेतील
लोकांच्या मृत्यूस
कारणीभूत असणा-यांवर
गुन्हे दाखल करणे
बाबत ...
महोदय,
कात्रज येथे टेकडीवरून
जोरदार पावसाचे पाणी आल्याने
झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा
मृत्यू झाला . या दु़र्घटनेस
बेकायदा टेकडीफोड करणारे, टेकडीवर
बेकायदा बांधकाम करणारे , रस्त्यांच्या
नावाखाली टेकड्यांवर चर खणणारे
यांच्या बरोबरच माध्यमांनी आणि
स्वयंसेवी संस्थांनी अशा बाबी
लक्षात आणून दिल्यानंतरही
त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे
अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत
. त्यामूळे या सर्वांवर
दुर्दैवी दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूस
कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल
करण्यात यावेत .
त्याच प्रमाणे केवळ
कात्रजच नव्हे
तर जिल्हातील सर्वच
टेकड्या आणि डोंगर
अशाच प्रकारे फोडले
जात आहेत आणि
त्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
होत आहे. त्याबाबही
दुर्घटना घडल्यास सर्व संबधितांवर
वरील प्रमाणेच गुन्हे दाखल
करण्यात यावेत.
पुण्यात दोन वर्षांपूर्वी बावधन
येथे पावसाच्या पाण्याने
हाहाकार माजवला होता. त्या
दुर्घटनेत सुमारे 11 जण मृत्यूमूखी
पडले होते . त्यानंतर पालिकेने
त्यासंदर्भात काही उपाययोजना
करण्याचे ठरविले होते , परंतु
त्या पूर्ण झाल्या
नाहीतच. शिवाय त्यानंतरही शहरातील
पाण्याचे अनेक नैसर्गीक
स्त्रोत, ओढे व
नाले अडविण्यात आल्याचे
किंवा नष्ट करण्यात
आल्याचे दिसून येते .त्यामूळेही
भविष्यात पुण्यातही अशाच दुर्घटना
घडण्याची शक्यता नाकारण्यात येत
नाही.
त्यामूळे पुणे शहर
आणि जिल्ह्यात अशा
दुर्घटना होउ नयेत
यासाठी युद्धपातळीवर कार्यकम घेउन अशा
दुर्घटना घडू नयेत
यासाठी प्रयत्न करावेत आणि
त्यातूनही अशी दुर्घटना
घडल्यास त्यासाठी जबाबदार असणा--या
सर्व संबधितांवर फौजदारी गुन्हे
दाखल करण्यात यावेत.
हि विनंती .
कळावे
आपले
मे.जन
(रिटा) एससीएन जटार
विजय कुंभार
नागरिक चेतना
मंच
सुराज्य संघर्ष समिती